28 May 2020

News Flash

ईव्हीएम बिघाडाने  मतदार त्रस्त

ईव्हीएम, व्हीव्हीपॅटमधील बिघाड आणि मतदारांची नाराजी हे लोकसभा निवडणुकीचे चित्र विधानसभेतही कायम राहिले.

संग्रहित छायाचित्र

अनेक जण रांगेतूनच परतले

ईव्हीएम, व्हीव्हीपॅटमधील बिघाड आणि मतदारांची नाराजी हे लोकसभा निवडणुकीचे चित्र विधानसभेतही कायम राहिले. मतयंत्र बदलून मतदान  प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने अनेक जण रांगेतूनच परतले. आज दिवसभर जिल्ह्य़ात २२९ व्हीव्हीपॅट आणि ५० ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या.

नागपूर जिल्ह्य़ातील १२ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि त्याबरोबरच ईव्हीएम, व्हीव्हीपॅटमधील बिघाडाच्या तक्रारी येऊ लागल्या. जिल्ह्य़ात ५० ठिकाणी बॅलेट युनिट, १३ ठिकाणी कंन्ट्रोल युनिट आणि २२९ व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाला. प्रशासनाने येथे दुरुस्ती करून नव्याने मतदान प्रक्रिया सुरू केली. मात्र, काही ठिकाणी अर्धा ते पाऊण तास विलंब झाल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी मतदार मतदान न करताच घरी परतले.  प्रतापनगरमधील एका मतदान केंद्रावरील अनेक मतदार रांगेतूनच घरी परतल्याचे समजते.

दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघातील पवनसूतनगर येथील अभंग प्राथमिक शाळेत बुथ क्रमांक ७५ चे ईव्हीएम सकाळी साडेनऊच्या सुमारास बंद पडले. भाजपच्या नगरसेविका निता ठाकरे यांनी दक्षिण नागपूर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवली.  येथील ईव्हीएम सकाळी सव्वा अकरा वाजता बदलण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवार असलेल्या दक्षिण-पश्चिममधील स्कूल ऑफ स्कॉलर, प्रतापगनर येथे बुथ क्रमांक १३१, खोली क्रमांक २ मध्ये सकाळी मतदानाला प्रारंभ होताच ईव्हीएममध्ये बिघाड झाला. मतदारांची रांग लागली होती. परंतु मतदारांना आत  जाऊ दिले जात नव्हते. शेवटी एकाने विचारणा केली असता  मतयंत्र काम करीत नसल्याचे कळले. मतदारांनी रांगेत लागून पंधरा ते वीस मिनिटे पूर्ववत मतदान सुरू होण्याची प्रतीक्षा केली. पण, मतयंत्र बदलण्यात आले नाही. त्यामुळे अनेकजण घरी परतले. येथील मतयंत्र सुमारे ४५ मिनिटांनी बदलण्यात आले, असे एका मतदाराने सांगितले.  तसेच दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील सेंट अ‍ॅन्टोनी आणि कुर्वेज मॉडेल स्कूलमध्ये दोन ईव्हीएम सकाळी सुमारे तासभर बंद होते.

पूर्व नागपुरातील हिवरीनगर येथील प्रशांत विद्यालयातील खोली क्रमांक ३ मधील मतदान केंद्रातील ईव्हीएममध्ये सकाळी १०.२० च्या सुमारास बंद पडले.

कपिलनगरातील केंद्र क्रमांक १२ येथे ईव्हीएममध्ये बिघाड झाला. येथे २० मिनिटे मतदान थांबले होते. नागपूर जिल्ह्य़ातील सहा मतदारसंघात देखील अशा प्रकारच्या घडल्या. प्रशासनाने ईव्हीएम बदलून दिले. जिल्हा प्रशासनानुसार, १५७ ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनिट बदलून देण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 1:15 am

Web Title: evm voter frightened akp 94
Next Stories
1 विक्की कुकरेजांच्या कार्यालयावर छापा
2 Maharashtra Assembly Election 2019 : विदर्भात उमेदवारावर हल्ला
3 सरपंचांना मानधन वाढीचा आनंद अल्पकालीन
Just Now!
X