27 May 2020

News Flash

पिंपरीमधील महायुतीच्या उमेदवाराचे फेसबुक अकाऊंट हॅक

आधी मोबाईल क्रमांक मेल आयडी हॅक झाले मग फेसबुक अकाऊंटच डिलीट झाले

फेसबुक अकाऊंट हॅक

पिंपरी मतदारसंघामधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढाणारे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांचे अधिकृत फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सायबर क्राईम पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. अगोदर चाबुकस्वार यांनी फेसबुकच्या अकाऊंटशी संलग्न असणारे मोबाईल क्रमांक, मेल आयडी हॅक झाले. त्यानंतर त्यांचे अकाऊंटच डिलीट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमागील सूत्रधार कोण आहे याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. चाबुकस्वार यांचे स्वीय सहाय्यक विजय जगताप यांनी सायबर क्राईममध्ये या घटनेची माहिती देत तक्रार दाखल केली आहे. घटनेचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

महायुतीचे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार गौतम चाबुकस्वार यांचे अधिकृत फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आल्याबद्दल त्यांच्या समर्थकांनी चिंता व्यक्त केली आहे. अद्याप हे अकाऊंट कोणी हॅक केलं हे समजू शकलेलं नाही. सध्या विधानसभेच्या निवडणूकीचे वारे राज्यभरात वाहत आहे. चाबुकस्वार यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन हजारो मतदार जोडले गेले होते. आपल्या अकाऊंटच्या माध्यमातून ते त्यांच्या मतदारसंघातील कामे नागरिकांपर्यंत पोहचत असत. मात्र, अचानक मंगळवारी त्यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले. मोबाईल क्रमांक, मेल आयडी त्यानंतर चक्क फेसबुक अकाऊंट डिलीट करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे याच्या पाठीमागे कोण आहे असा सवाल उपस्थित होत आहे. ऐन निवडणुकीच्या काळातच फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याने या मागचा सूत्रधार कोण आहे याचा त्वरीत शोध घेण्यात यावा अशी मागणी चाबुकस्वार यांच्या समर्थकांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2019 10:47 am

Web Title: facebook account of gautam chabukswar hacked scsg 91
Next Stories
1 अंबरनाथमध्ये आघाडीत मनोमीलन
2 पुणे : विलास लांडे, राहुल कलाटे यांचे प्रकाश आंबेडकरांना पाठिंब्यासाठी साकडं
3 VIDEO: ९८ वर्षांचे बाबासाहेब पुरंदरे संघाच्या पथसंचलनात झाले सहभागी
Just Now!
X