महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यानं नवं सरकार स्थापन झालं. परंतु तीनच दिवसांमध्ये हे सरकार कोसळलं. प्रथम अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे आता निश्चित झालं आहे. दरम्यान, या कालावधीत अनेक घडामोडी घडल्या. यावर प्रतिक्रिया देताना यावर मला काही बोलयचं नसून मी योग्य वेळी सर्वकाही बोलेन. राजकारण वेगळ्या ठिकाणी आणि कुटुंब वेगळ्या ठिकाणी असं म्हटलं आहे.

आणखी वाचा- मी राष्ट्रवादीचा होतो, आहे आणि राहणार : अजित पवार

मी यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो, आताही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे आणि यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिन, असं अजित पवार यावेळी म्हणाले. मध्यंतरी आलेल्या वृत्तांमध्ये तसूभरही सत्य नव्हतं. मला सध्या काही बोलायचं नाही. मी योग्य वेळी बोलेन. आम्ही सर्व सहकारी सोबतच आहोत. शरद पवार आमचे नेते आहेत. त्या अधिकारानेच मी त्यांची भेट घेतली. मी नेहमीच आनंदी असतो. राजकारण वेगळ्या ठिकाणी आणि कुटुंब वेगळ्या ठिकाणी असंही त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- जनतेच्या मनातला महाराष्ट्र पाच वर्षात घडवू : सुप्रिया सुळे

मंगळवारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. काही वेळापूर्वीच ही बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासूनच सुरु होते. अखेर मंगळवारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते हे अजित पवारांच्या भेटीला गेले होते. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु होते.