27 May 2020

News Flash

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंविरोधात आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार

माजी आमदार नरसय्या आडम यांनी प्रणिती शिंदे यांची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे

प्रणिती शिंदें यांचे संग्रहित छायाचित्र

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार दाखल करण्यात आली आहे. माजी आमदार नरसय्या आडम यांनी हा आरोप केला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना मेकअप बॉक्स वाटल्याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा केली. तरीही प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्ते दुपारी साडेबाराच्या सुमारास सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात मेकअप बॉक्स वाटत होते असा आरोप आडम यांनी केला.

मतदारांना मेकअप बॉक्स देऊन प्रणिती शिंदे यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे असे म्हणत आडम यांनी यासंदर्भातली तक्रार जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी आपण या प्रकरणी चौकशी करु, काही तथ्य आढळले तर कारवाई करु असे आश्वासनही दिले. आडम मास्तर यांनी लेखी तक्रार देण्यास मी सांगितलं आहे. पोलिसांमार्फत आपण याप्रकरणी कारवाई करु असं राजेंद्र भोसले यांनी म्हटलं आहे. टीव्ही नाईन मराठीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?
नरसय्या आडम यांनी केलेल्या तक्रारीनंतर आणि आरोपानंतर प्रणिती शिंदे यांनीही यावर भाष्य केलं. ” आडम मास्तर यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. केवळ स्टंटबाजी म्हणून आडम मास्तर यांनी कॅमेरासमोर माझ्यावर आरोप केले आहेत. ” असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात सध्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे प्रतिनिधीत्त्व करतात. माकपचे माजी आमदार आणि कामगार नेते नरसय्या अडाम यांचा त्यांनी मागच्या निवडणुकीत पराभव केला. त्यानंतर 2014 मध्ये मोदी लाट असतानाही प्रणिती शिंदे निवडून आल्या. आता माझ्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा खोटा आरोप केला जातो आहे असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2019 8:50 pm

Web Title: former mla narsayya adam file complaints against congress mla praniti shinde for breach of code of conduct scj 81
Next Stories
1 १५ वर्षांपासून फरार असलेला एका आरोपीसह इतर आरोपींना पोलिसांकडून अटक
2 बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत शिवसेना शिवसेना होती : नारायण राणे
3 नवे रस्ते घडवलेत तरी घडेल नवा महाराष्ट्र! आदित्य ठाकरेंच्या ट्विटला सुमीत राघवन यांचे उत्तर
Just Now!
X