राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या दृष्टीने समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत असून, त्यांच्या वाटाघाडी मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद आणि इतर खात्यांसंदर्भात सुरू आहेत. कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल, तो किती वर्षांसाठी असेल, कोणत्या पक्षाचा उपमुख्यमंत्री असेल तोही किती वर्षांसाठी असेल, याबाबत जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. शिवाय कोणत्या पक्षाला कोणत्या किती मंत्रिपदे असावीत, यावर एकमत होण्यासाठी धडपड सुरू असल्याचे समजते. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या दृष्टीने समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत असून, त्यांच्या वाटाघाडी मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद आणि इतर खात्यांसंदर्भात सुरू आहेत. कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल, तो किती वर्षांसाठी असेल, कोणत्या पक्षाचा उपमुख्यमंत्री असेल तोही किती वर्षांसाठी असेल, याबाबत जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. शिवाय कोणत्या पक्षाला कोणत्या किती मंत्रिपदे असावीत, यावर एकमत होण्यासाठी धडपड सुरू असल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा- शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

शिवसेना आतापर्यत मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेली आहे. त्यासाठी त्यांनी भाजपाशी असलेली युतीही तोडली आहे. त्यामुळे शिवसेना या महाशिवआघाडीतही मुख्यमंत्रिपदासाठी अडून आहे. शिवसेनेचे संख्याबळ ५६ आहे, त्यापेक्षा राष्ट्रवादीकडे केवळ २ आमदार कमी आहेत. ५४ आमदारांचे बळ असलेली राष्ट्रवादीही पहिल्या टर्मसाठी आग्रही राहू शकते. यातही वाटाघाडी झाल्याच तर अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद वाटून घेतले जाऊ शकते. काँग्रेसच्या वाट्याला यात ५ वर्षांसाठी उपमुख्यमंत्रिपद येण्याची शक्यता आहे. काँग्रेसला पाच वर्षांनी पुन्हा सत्तेत येण्यासाठी या पदावर समाधान मानावे लागेल. कारण, ”सत्तेत सहभागी झालो नाही तर राज्यातील काँग्रेस संपेल,” असा इशारा  काँग्रेसच्या नेत्यांनी अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिला आहे.

आणखी वाचा- शिवसेना आघाडीसोबत जाऊ नये म्हणून भाजपाचे प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण

या महाशिवआघाडीची सर्व समीकरणे जुळून आली तर पहिल्या अडीच वर्षात शिवसेनेचे मुख्यमंत्री, दुसऱ्या अडीच वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राज्याला मिळेल. काँग्रेसकडे ५ वर्षे उपमुख्यमंत्रिपद असेल.

कोणत्याही परिस्थितीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे तिन्ही पक्ष सत्ता समीकरणांची जुळवाजुळव करत आहेत. महाराष्ट्रात जास्तीत जास्त ४३ मंत्री असू शकतात. त्यात एक मुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री सोडला तर उरतात ४१ मंत्रिपदे. त्यातील मंत्रिपदांचे वाटप संख्याबळानुसार केले जाऊ शकते. त्यात शिवसेनेला १४, राष्ट्रवादीला १३ ते १४ आणि काँग्रेसला ११ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Formula for shivsena ncp congress government in maharashtra sgy
First published on: 13-11-2019 at 17:09 IST