महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर सुरु असणाऱ्या अनेक नाट्यमय घाडमोडींनंतर अखेर मंगळवारी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटला. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिक्कामोर्तब केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. फडणवीस यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मीम्स व्हायरल होऊ लागले. विशेष म्हणजे नेहमी भाजपा समर्थकांच्या निशाण्यावर असणाऱ्या विरोधी पक्षांच्या समर्थकांनी यंदा भाजपा समर्थकांना मीम्समधून टोला लगावला. याच मिम्समध्ये बरनॉल क्रीमचा उल्लेख अनेकदा झाल्याचे पहायला मिळाले. सत्तास्थापनेनंतर आनंद व्यक्त करणाऱ्या भाजपा समर्थकांनी फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर जळफळाट झाला असेल तर बरनॉल लावावी असा सल्ला विरोधकांनी दिली आहे. विशेष म्हणजे बरनॉल क्रीमसंदर्भातील गुगल सर्चमध्येही वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.

भाजपा समर्थकांनी बरनॉल वापरण्याचा सल्ला देणारे अनेक ट्विटस आणि पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाल्या होत्या. इंटरनेटवर वारंवार होणाऱ्या बरनॉलसंदर्भातील सर्चचा परिणाम गुगल ट्रेण्डमध्येही दिसून आला. मंगळवारी दुपारनंतर म्हणजेच फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर बरनॉलसंदर्भातील सर्च वाढल्याचे दिसत आहे. दुपारी दीड वाजल्यापासून म्हणजेच सर्वोच्च न्यायलयाने बहुमत चाचणी घेण्याचा आदेश दिल्यानंतर आणि अजित पवार राजीनामा देण्याची बातमी समोर आल्यानंतर बरनॉलसंदर्भात सर्च वाढल्याचे चित्र गुगल ड्रेण्ड्समध्ये दिसत आहे. त्यानंतर पुन्हा रात्री पुन्हा बरनॉलसंदर्भातील सर्च वाढल्याचे दिसून आले.

Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
Rohit Pawar Post Against Raj Thackeray
“तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर रोहित पवारांची पोस्ट
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
nashik crime news, nashik frau marathi news
नाशिकमध्ये कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेत फसवणूक, दोन सावकारांविरोधात गुन्हा; छाप्यात करारनामे, कोरे मुद्रांक, धनादेश जप्त

मंगळवारी बरनॉलबद्दल सर्च होणाऱ्या प्रदेशामध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी होता. त्या खालोखाल गोवा, दिल्ली, आसाम आणि गुजरात या राज्यांमध्ये बरनॉलसंदर्भात सर्च झाले.

विशेष म्हणजे गुगल ट्रेण्ड्समधील रिलेटेड टॉपिकमध्ये बरनॉलशी संदर्भात सर्च हा भाजपाची महाराष्ट्रातील सत्ता जाणार यासंदर्भातीलच असल्याचे दिसते. रिलेटेड टॉपिक म्हणजेच एखादी गोष्ट कोणत्या घटनेसंदर्भात शोधली गेली यासंदर्भातील माहिती. बरनॉलशी रिलेटेड टॉपिकमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर भारतीय जनता पार्टी, मीम्स आणि ट्रक हे दोन टॉपीक होते. या टॉपिकसंदर्भातील सर्च आणि बरनॉल असं सर्च करण्याच प्रमाण वाढलेलं दिसतं असा याचा अर्थ होतो. बरनॉल आणि भाजपासंदर्भतील सर्च १८० टक्क्यांनी वाढला, बरनॉल मिम्सचा सर्च १४० टक्क्यांनी तर बरनॉल ट्रकचा सर्च ११० टक्क्यांनी वाढल्याचे गुगल ट्रेण्डची आकडेवारी सांगते.

पाहा बरॉनलसंदर्भातील काही व्हायरल झालेले मिम्स

अशाप्रकारे राजकीय घडामोडींनंतर बरनॉल क्रीम चर्चेत येण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही यंदा २४ मे रोजी लोकसभाचा निकाल लागला त्या दिवशी बरनॉल क्रीम चर्चेत आली होती. त्यावेळेस भाजपा समर्थकांनी पक्षाला मिळालेल्या बहुमताचा आनंद व्यक्त करताना विरोधकांना ही क्रीम लावण्याचा सल्ला दिला होता. मोदी सरकार पुन्हा बहुमताने सत्तेवर येणार अशा मतमोजणीच्या कलाने हर्षोल्हसित दलाल स्ट्रीटवर निकालाच्या दिवशी सेन्सेक्सने पहिल्यांदाच ४० हजारांपुढे मुसंडी मारली. त्यामुळे शेअर मार्केटमधील सर्वच कंपन्यांच्या शेअर्सची किंमत वधारली होती. याचा परिणाम सर्व फार्मा म्हणजेच औषध कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीवरही दिसून आला. म्हणूनच बरनॉल बनवणाऱ्या मॉरपेन लॅबच्या शेअर्सची किंमतही त्या दिवशी आठ टक्क्यांनी वाढली होती.