30 October 2020

News Flash

फक्त राऊत आणि राऊतच… लोकप्रियतेत उद्धव आणि आदित्य यांनाही धोबीपछाड

जाणून घ्या देशभरामध्ये कशाप्रकारे राऊत यांच्या नावाची चर्चा आहे

राऊत आणि राऊतच

राज्यामधील विधानसभेच्या निकालाला १४ दिवस उलटून गेल्यानंतरही राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. भाजपाने वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे युतीतील सर्वात मोठा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेने निवडणुकीआधी ठरलेल्या ५०-५० सुत्रानुसार अडीच वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेनेला देण्याच्या मागणीवर अडून बसल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान मागील १४ दिवसांपासून ‘सामना’च्या अग्रलेखांमधून भाजपावर टीका केली जात आहे. भाजपाचे खासदार संजय राऊत मागील काही दिवसांपासून रोज पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट करताना दिसत आहेत. रोज टीव्हीवर झळकणाऱ्या राऊत यांची इंटरनेटवरील लोकप्रियता कमालीची वाढली आहे. गुगल ट्रेण्ड्सनुसार तर मागील आठ दिवसांमध्ये राऊत यांच्याबद्दल गुगलवर देशभरातून सर्च होण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख तसेच वरळीचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा राऊत यांच्याबद्दलची माहिती अधिक जास्त वेळा सर्च होताना दिसत आहे.

‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’, ‘भाजपा सत्ता स्थापन करणार नसेल तर आम्ही करु’, ‘१४४ आकडा दाखवणाऱ्यांनी सत्ता स्थापन करावी’, ‘आधी ठरल्याप्रमाणेच होऊ द्या’, ‘सेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही शेतकऱ्यांची इच्छा आहे’, अशी अनेक वक्तव्य मागील काही दिवसांपासून राऊत यांनी पत्रकार परिषदांमधून केली आहे. तसेच मी पक्षाची भूमिका मांडत असल्याचेही त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांपासून राऊत रोज सकाळी साडे नऊ ते साडेदहाच्या सुमारास पत्रकार परिषदेमधून भाजपावर टीका करताना “मुख्यमंत्रीपद अडीच वर्षासाठी शिवसेनेला हवे आहे या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत,” असं सांगताना दिसत आहेत. त्यामुळेच राऊत यांचे नाव राज्यातीलच नाही तर देशभरातील प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. यामुळेच त्यांच्याबद्दल देशभरातून माहिती सर्च करण्याचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे राऊत रोज बोलत असताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रसारमाध्यमांसमोर येऊन भूमिका मांडताना एकदाही दिसलेले नाही. सत्ता स्थापनेसाठी युतीमध्येच रस्सीखेच दिसून येत असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेण्यासाठी राज्यातील वेगवगेळ्या भागांमध्ये फिरताना दिसत आहेत. यासंदर्भातील बातम्यांमुळे या दोघांचे नाव चर्चेत आहे. मात्र या दौऱ्यांपेक्षा राज्यात कोणाचे सरकार येणार यासंदर्भातील माहिती अधिक सर्च केली जात असल्याने राऊतांचे नाव हे गुगल ट्रेण्डमध्ये उद्धव आणि आदित्य यांच्यापेक्षा वर दिसत आहे.

गुगल ट्रेण्डनुसार निवडणुकांचे निकाल लागले त्या दिवशी म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यापैकी सर्वाधिक सर्च हे उद्धव ठाकरे आणि त्या खालोखाल आदित्य ठाकरेसंदर्भात झाले. विशेष म्हणजे निकालाच्या दिवशी उद्धव ठाकरेंऐवजी आदित्य ठाकरेंचे नाव अधिक वेळा सर्च झाले. निकालानंतर चार दिवस म्हणजेच २८ तारखेपर्यंत हाच ट्रेण्ड दिसला. मात्र त्यानंतर संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका त्यामाध्यमातून मांडू लागल्यानंतर राऊत हे उद्धव आणि आदित्य यांच्यापेक्षा जास्त सर्च होऊ लागले. विशेष म्हणजे या तिघांच्या नावांसंदर्भात होणाऱ्या सर्चच्या प्रमाणामध्ये मोठा फरक असून अचानक राऊत यांच्याबद्दल होणाऱ्या सर्चमध्ये वाढ झाली असून आदित्य यांच्या नावाच्या सर्चमध्ये कमालीची घट झाल्याचे पहायला मिळत आहे.

महाराष्ट्राखालोखाल हरयाणा, आसाम आणि झारखंडमधून राऊत यांच्याबद्दल सर्वाधिक सर्च झाले आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात महाराष्ट्राबरोबरच गुजरात, पंजाब, हरयाणा, ओडिसा, कर्नाटक आणि केरळमधून सर्वाधिक सर्च झाले आहे.

तर आदित्य यांच्याबद्दल सर्च करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राबरोबर छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड, पंजाब, हरयाणा आणि आसाम या राज्यांच्या समावेश आहे.

दरम्यान, शिवसेनेची भूमिकाच आपण पत्रकार परिषदांमधून मांडत असल्याने राऊत यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे. तसेच आपण केवळ पक्षाचे काम करत असल्याचे राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 10:42 am

Web Title: google trends shivsena sanjay raut beats uddhav thackeray and aditya thackeray scsg 91
Next Stories
1 शिवसेनेचे आमदार फोडण्याची कोणाची हिंमत नाही : संजय राऊत
2 बीड: जिल्हा रुग्णालयाच्या गच्चीवर ‘लव्ह, सेक्स आणि दारु’
3 अरेरे! नदीत जायबंदी झालेल्या वाघाचा अखेर मृत्यू
Just Now!
X