तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला राज्यपालांनी राजभवनावर बोलावलं होतं. आम्ही आमच्या मित्रपक्षाशी याबाबत चर्चा करु. आमचा सत्ता स्थापनेचा दावा सिद्ध करण्यासाठी उद्या रात्री ८.३० पर्यंत वेळ देण्यात आली आहे असं जयंत पाटील यांनी सांगितलं. आता सत्तास्थापनेसाठी आम्ही काँग्रेसशी चर्चा करु असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. दावा सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला मुदत देण्यात आली आहे.

सुरुवातीला राज्यपालांनी बोलावलं म्हणून राजभवनावर चाललो आहोत असं अजित पवार यांनी सांगितलं होतं. मात्र जयंत पाटील यांनी सांगितल्याने सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठीच बोलावलं आहे हे स्पष्ट झालं. दरम्यान विरोधी पक्षामध्ये बसण्याचा जनादेश आम्हाला मिळाला आहे असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. राज्यपालांनी बोलवल्यामुळे अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे नेते राजभवनच्या दिशेने रवाना झाले होते. दिलीप वळसे पाटीलही त्यांच्यासोबत आहेत.

आज सकाळपासून महाराष्ट्र आणि दिल्लीत घडणाऱ्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून होतो. आता राज्यपालांचा मला फोन आला होता त्यामुळे आम्ही चाललो आहोत. जर आम्हाला राज्यपालांनी पत्र दिलं तर काँग्रेसशी चर्चा करु आणि पुढचा निर्णय कळवू असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा केला होता. मात्र हा दावा सिद्ध करण्याची मुदत संपलेली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला पाचारण करण्यात आलं आहे.