राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन भाजपात आलेल्या गणेश नाईक यांच्यामुळे विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत भाजपाकडून गणेश नाईक यांना तिकिट मिळण्याबाबत हिरवा कंदिल मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे असे झाल्यास विद्यमान आमदार मंदा म्हात्रे नाराज होणार हे निश्चित मानलं जातं आहे. बेलापूर मतदारसंघात गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांसोबत विभागवार बैठकांना सुरुवातही केली आहे. काही दिवसांपूर्वीच गणेश नाईक राष्ट्रवादी सोडून भाजपात आले. मात्र त्यांच्या येण्याचा फटका विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना बसल्याची चर्चा नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काहीही झालं तरीही बेलापूरची आमदार मीच असेन असं मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशाच्या आधी आणि त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या वेळीही सांगितलं होतं. गणेश नाईक यांना भाजपात घेण्यासाठी मंदा म्हात्रे यांनी विरोधही दर्शवला होता. मात्र भाजपाने त्यांची समजूत घातली. गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशाच्या कार्यक्रमातही मंदा म्हात्रे उपस्थित होत्या. मात्र त्यांना भीती होती ती आपलं तिकिट कापलं जाण्याची आणि जी चर्चा सुरु आहे त्यावरुन अशीच शक्यता आहे की मंदा म्हात्रे यांचं तिकिट कापलं जाणार. समजा मंदा म्हात्रे यांचं तिकिट कापलं गेलं तर त्या नाराजीचा सूर आळवतील यामुळे काय होईल ते येत्या काळात स्पष्ट होईल, तूर्तास तरी गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशामुळे मंदा म्हात्रे यांची धाकधूक वाढली आहे असंच चित्र आहे.

A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
ajit pawar and supriya sule
स्नुषाविरोधात प्रचार करण्यास नकार देण्याची एकनाथ खडसेंची भूमिका सुसंस्कृतपणाची;  खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना चिमटा
ram satpute marathi news, praniti shinde marathi news
सोलापूरमध्ये ‘उपऱ्या’वरूनच भाजपच्या सातपूते यांची कोंडी
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

महाराष्ट्र विधानसभेचे उमेदवार ठरवण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरु आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेही हजर आहेत. या बैठकीत २८८ जागांचा आढावा घेतला जातो आहे. युती झाली नाही तर स्वबळाचीही चाचपणी सुरु आहे असेही समजते आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनेही बेलापूर मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यामुळे बेलापूरची जागा शिवसेनेला हवी आहे का? असंही चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार हे काही दिवसात स्पष्ट होईल.