01 June 2020

News Flash

आकडय़ांच्या खेळातून उमेदवारांकडून छुपा प्रचार

प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावल्या असल्या तरी अनेक उमेदवारांनी छुपा प्रचार सुरूच ठेवला होता.

मतदान यंत्रांवरील उमेदवारांच्या आकडय़ांचे मिम्स, फलकांद्वारे मतदारांना इशारा

प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावल्या असल्या तरी अनेक उमेदवारांनी छुपा प्रचार सुरूच ठेवला होता. नालासोपारा मतदारसंघातील शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदानाच्या दिवशी कल्पकतेने प्रचार केला.  त्यांनी ‘ईव्हीएम’मधील उमदेवारांच्या आकडय़ांना अधोरेखित करणारे मिम्स आणि फलक बनवून अनोखा प्रचार केला.

नालासोपारा मतदारसंघातील मतदानयंत्रात शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांना एक क्रमांक तर बविआचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांना सात क्रमांक देण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी प्रचार करताना १ आणि ७ या आकडय़ांचा वापर करून प्रचार सुरू केला होता. रविवार रात्रीपासून या आकडय़ांचा कल्पकतेने वापर करून मिम्स आणि फलक बनवून ते समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात येत होते. शिवसेनेने मिम्स बनवताना ‘हे बघ भाऊ  आपण १ नंबरचे बटण दाबणार’, ‘२  नंबरचे काम करत नाही’, असे मिम्स बनवले होते. तर सोमवारी दिवसभर ‘चोरांची साथ नको १ सच्चा

माणूस हवा’, ‘एक’मेव सक्षम पर्याय’ असे फलक बनवून समाजमाध्यमावर प्रसारित केले. त्यातून शर्मा यांचा १ हा आकडा अधोरेखीत करण्यात येत होता. बहुजन विकास आघाडीनेही सात आकडय़ावर जोर देत फलक बनवले आणि विविध मिम्स समाजमाध्यमावरून दिले. त्यात ‘आम्हाला ७ द्या’ असा फलक गाजला.

बोईसरमध्ये टी शर्टवरून उमेदवाराला नोटीस

बोईसर : बोईसर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराने ईव्हीएमवरील क्रमांक व पक्षाचा रंग दाखवणारे टी शर्ट निवडणूक केंद्रावर कार्यकर्त्यांना देण्यात आले होते. मात्र विरोधकांनी याबाबत आक्षेप नोंदवल्यानंतर पोलिसांनी हे टी र्शट काढून घेण्यात आले. याबाबत निवडणूक विभागाकडे संबंधित उमेदवाला नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र निवडणूक चिन्हाचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख टी शर्टवर नसल्याने कारवाई होण्याची शक्यता नसल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 1:56 am

Web Title: hide promoting candidate vidhan sabha election akp 94
Next Stories
1 पालघर मतदारसंघात कमी मतदान
2 जोरदार पावसाने कृष्णाकाठी पूरसदृश्य स्थिती
3 रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा फटका
Just Now!
X