भाजपाचे अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी स्वतःबाबतच एक वक्तव्य केलं आहे. पुढची 20 वर्षे मीच खासदार राहणार असं सुजय विखे पाटील यांनी सांगून टाकलं आहे. “पुढील 20 वर्षे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा खासदार मीच असणार आहे. तुमची कामं करायची असतील तर मलाच पुन्हा निवडून द्या ” असेही सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे. नगर तालुक्यातील गुंडेगाव या ठिकाणी विकास कामांचे उद्घाटन झाले त्याच कार्यक्रमात सुजय विखे पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी सुजय विखे पाटील यांनी संगमनेर या ठिकाणी महाजनादेश यात्रेदरम्यान इंदुरीकर महाराजांना भाजपाचा गमझा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र इंदुरीकर महाराजांनी सुजय विखे पाटील यांचा हात धरत मी कोणत्याही पक्षाचं राजकीय बॅनर गळ्यात घालणार नाही असं स्पष्ट केलं आणि सुजय यांना रोखलं. या घटनेची चर्चाही अहमदनगरमध्ये चांगलीच रंगली होती. सुजय विखे पाटील यांनी भाजपा प्रवेशानंतर अहमदनगरमध्ये लोकसभा निवडणूक लढवली. राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आणि भाजपाचे सुजय विखे पाटील यांच्यात हा सामना झाला. ज्यामध्ये सुजय विखे पाटील विजयी झाले. आता पुढची वीस वर्षे मीच नगर लोकसभा मतदारसंघातून निवडून येईन असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I will be next mp for 20 years and bjp will remain in power says sujay vikhe patil in ahamadnagar scj
First published on: 18-09-2019 at 21:07 IST