17 October 2019

News Flash

ब्ल्यू प्रिंट नाही ब्ल्यू फिल्मच काढायला हवी होती लोकांनी पाहिली असती: राज ठाकरे

गोरेगाव या ठिकाणी राज ठाकरेंची सभा

महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट देणारा पहिला पक्ष मनसे होता असं म्हणत राज ठाकरेंनी २०१४ चीही आठवण केली. मी माझ्या पहिल्या सभेत ब्ल्यू प्रिंटचा उल्लेख केला. मला कायम विचारलं जायचं की ब्ल्यू प्रिंट कधी आणणार? जेव्हा मी जेव्हा ब्ल्यू प्रिंट समोर आणली तेव्हा एकाही पत्रकाराने पाहिली नाही. काही दिवसांपूर्वी मला पत्रकार परिषदेत पत्रकाराने विचारलं तुमच्या ब्ल्यू फिल्मचं काय झालं? ब्ल्यूफिल्म? काय बोलायचं? पण आता वाटतं आहे की ब्ल्यू प्रिंटऐवजी ब्लू फिल्म काढली असती तर बरं झालं असतं लोकांनी ती पाहिली तरी असती. पत्रकारांनी वारंवार पाहिली असती असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

ईडीची चौकशी करा किंवा काहीही करा, माझं बोलणं थांबणार नाही असं मी ईडी कार्यालयाबाहेर आल्या आल्या सांगितलं होतं. मला या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. गोरेगाव या ठिकाणी ते बोलत होते.

आणखी वाचा- महायुतीच्या सत्तेत समाधानी माणूस कुठे आहे दाखवा? : राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांताक्रूझ पाठोपाठ गोरेगाव या ठिकाणीही विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा घेतली. माझी मावशी गोरेगावत रहात असे त्यावेळी जास्त येणं व्हायचं. आता तेवढं येणं होत नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी जुन्या आठवणींना आपल्या भाषणातून उजाळा दिला.

First Published on October 10, 2019 8:48 pm

Web Title: i wish i made a blue film instead of blue print says raj thackery scj 81