भाजपाने संख्याबळाशिवाय सत्ता स्थापन करणं किंवा शपथविधी पार पाडणं धोक्याचं ठरु शकतं. विधानसभेत बहुमत सिद्ध करताना भाजपाचा विश्वासमत ठरावात पराभव होऊ शकतो असं भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. या संदर्भातलं ट्विटच सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेने हक्क सांगितला आहे. अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितलं आहे त्यामुळे हा पेच निर्माण झाला आहे. अशात संख्याबळ असल्याशिवाय भाजपाने सरकार स्थापन करणं धोकादायक असल्यचं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- …तर विरोधी पक्षात बसून जनतेची सेवा करा, RSS चा भाजपाला संदेश

२४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. दोन्ही पक्षांच्या १६१ जागा आहेत. याचाच अर्थ जनेतेने त्यांनाच कौल दिला आहे. अशात शिवसेनेने सत्तेत अर्धा वाटा आणि अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितलं आहे. मात्र अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद असा काहीही ठराव झाला नव्हता असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या दिवशी घरी आलेल्या पत्रकारांना अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं. त्यानंतर या दोन्ही पक्षांमधली चर्चा थांबली. आता सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. अशात सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपाने अल्पमतातलं सरकार स्थापन करु नये असा सल्ला दिला आहे.