24 November 2020

News Flash

ज्योतिरादित्य शिंदे यांचा तरुणाईशी संवाद; ऋतुराज पाटीलला साथ देण्याचे आवाहन

महाराष्ट्र सरकारने चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास काढून टाकला हे अत्यंत दुर्दैवी आहे

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. रोजगार निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांमध्ये २२०० उद्योग सरकारी धोरणामुळे बंद पडले आहेत, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस  सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंदिया यांनी शुR वारी येथे केली. युवकांनी उठा; जागे व्हा आणि कोल्हापूरच्या नवनिर्मितीसाठी ऋतुराज पाटील यांना साथ द्या, असे आवाहन त्यांनी तरुणाईशी साधताना केले.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ ‘युथ कनेक्ट’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ऋतुराज यांच्या संकल्पित विकासकार्यावर आधारित ‘मिशन रोजगार’ या संकल्पनेचे प्रकाशन सिंदिया यांच्या हस्ते झाले. आमदार सतेज पाटील, डॉ संजय डी पाटील, प्रतिमा सतेज पाटील, तेजस पाटील, बाजीराव खाडे उपस्थित होते.

तरुणच जिल्ह्यचा, राज्याचा, देशाचा आणि जगाचा इतिहास घडवतात. कारण त्यांच्या मनात कोणाविषयी भीती नसते की चिंता. उलट काही करून दाखवण्याची उत्सुकता असते, असा उल्लेख करून त्यांनी वर्तमानाच्या चौकटीत राहून आपले भविष्य घडवताना आपला इतिहास माहिती असणे गरजेचे आहे. त्याशिवाय भविष्य निर्माण होत नाही. साताऱ्याजवळ असलेल्या कण्हेरखेड गावचे आम्ही पाटील आहोत, तिथूनच आमची सुरुवात झाली, इथल्या मातीशी मी जोडलेलो आहे; असे म्हणत त्यांनी श्रोत्यांना भावनिक साद दिली.

महाराष्ट्र सरकारने चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास काढून टाकला हे अत्यंत दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराज हे देशातील सर्वश्रेष्ठ  योद्धा होते, असेही सिंदिया म्हणाले. कोल्हापुरात उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी मोठी संधी आहे. त्याबाबतच्या विविध प्रकारच्या संकल्पना हाती घेतलेल्या ऋतुराजला संधी द्यावी, तो त्याची कार्यक्षमता नक्कीच तुम्हाला दाखवेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2019 4:09 am

Web Title: jyotiraditya scindia interaction with the youth in kolhapur zws 70
Next Stories
1 बनावट नोटा छापण्याचा प्रकार कोल्हापुरात उघड
2 जनतेचा पाठिंबा गमावल्याने आघाडीचे ‘वंचित’ विरुद्ध आरोप
3 साखर कामगारांचा उपाशीपोटी प्रचार
Just Now!
X