12 July 2020

News Flash

प्रचाराची आज सांगता

बेलापूर, ऐरोली, पनवेल आणि उरण  मतदारसंघात सुरुवातीपासून प्रचारात असलेला निरुत्साह शेवटच्या टप्प्यातही थोडासा कमी झाला

सायंकाळी ५ नंतर तोफा थंडावणार; मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक प्रशासन, पोलीस सज्ज

बेलापूर, ऐरोली, पनवेल आणि उरण  मतदारसंघात सुरुवातीपासून प्रचारात असलेला निरुत्साह शेवटच्या टप्प्यातही थोडासा कमी झाला. शनिवारी सायंकाळी ५ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने उमेदवारांनी त्याआधी मतदारांशी थेट संवादावर भर दिला. प्रचार संपताच मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक प्रशासन आणि पोलीस सज्ज होतील. एकूण ८३० मतदान केंद्रे मतदानासाठी सज्ज असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस तैनात करण्यात आला आहे.

शनिवारी सायंकाळी पाच वाजता प्रचार संपल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीसाठीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघात ७१ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळे शहरात राज्य राखीव दलाच्या  तुकडय़ाही तैनात करण्यात आल्या आहेत.

दोन्ही मतदारसंघातील निवडणूक केंद्र तसेच निवडणूक कर्मचारी यांच्याबाबत ठोस निर्णय घेत तयारीची पाहणी शुक्रवारी करण्यात आली. बेलापूर मतदारसंघात १७ उमेदवार असल्याने या मतदारसंघात दोन बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहेत.परंतु १७ वा उमेदवार आणि एक नोटा असे दुसऱ्या बॅलेट मशिनवर वापरण्यात येणार आहे.  ऐरोली मतदारसंघात एकाच बॅलेट युनिट असेल.

निवडणूक प्रक्रियेत कोणताही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठीची सर्व तयारी करण्यात आल्याची  माहिती बेलापूर निवडणूक अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली. ऐरोली मतदारसंघातही तयारी पूर्ण झाल्याचे निवडणूक अधिकारी अभय करगुटकर यांनी सांगितले.

सुरक्षेबाबत योग्य ती तयारी करण्यात आली असून आवश्यक ते पोलीस विभागाचे सहकार्य देण्यात येत आहे. निवडणूक शांततेत होण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आली आहे. अतिरिक्त व्यवस्थाही करण्यात आली आहे.   -पंकज डहाणे, पोलीस उपायुक्त ,परिमंडळ १

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2019 1:22 am

Web Title: last day election promotion akp 94
Next Stories
1 नवी मुंबईच्या प्रेमापोटी भाजपमध्ये प्रवेश
2 कोल्हापुरी आकाशकंदील बाजारात
3 नवी मुंबईतील सागरी किनारा मार्गाविरोधात याचिका
Just Now!
X