औरंगाबाद : उद्योग क्षेत्रावर असणारी मंदीची छाया, परिणामी औद्योगिक वसाहतीतून अनेक कामगारांना नोकरीवरून काढले जात असताना औरंगाबाद येथील ‘ओरिक’ हॉलच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योगांना दिलासा मिळेल अशा काही घोषणा करतील असे अपेक्षित होते. मात्र, औरंगाबादच्या कार्यक्रमात महिला अग्रेसर आणि उद्योजक काहीसे पाठीमागे असे चित्र दिसून आले. ‘उज्ज्वला’, ‘घरकुल’ , ‘मुद्रा’ योजनेतून बचत गटांना दिले जाणारे कर्ज, अशा महिलाकेंद्रित योजनांचा ऊहापोह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात केला. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महिलेचे मत भाजपासाठी केंद्रस्थानी असेल असा संदेश दिला गेला.

‘होम’ आणि ‘हाऊस’ अशा दोन शब्दांचा वापर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराकडे बघण्याचा सरकारचा दृष्टिकोन अधिक विस्ताराने मांडला. ते म्हणाले, यापूर्वी घरकुलाची योजना होती. मात्र, आम्ही घराला घरपण देतो आहोत. केवळ िभती बांधत नाही तर त्यात सुविधाही निर्माण करून देतो आहोत. राज्यातील महिला बचत गटांसमोर पंतप्रधानांनी केलेले हे भाषण अधिक महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

सर्वसाधारणपणे विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या, की बचत गटाचे मेळावे होतात हे चित्र तसे नवे नाही. मात्र, औरंगाबाद येथे थेट पंतप्रधान मेळाव्याला उपस्थित राहिल्याने बचत गटाची चळवळ बाळसे धरेल, असा दावा सरकारी यंत्रणा करत असली तरी त्यातील राजकारण अधिक ठसठशीतपणे समोर येत होते. बचत गटातील महिलांचा वापर फक्त गर्दी म्हणून केला जातो. हा पूर्वीचा अनुभव आघाडी सरकारच्या काळातही राजकीय कार्यकर्त्यांना येत होता. या वेळी अधिक शिस्तीत आणि मोठय़ा संख्येने महिलांना एकत्रित केले गेले. त्यामुळे ग्रामीण भागाचे बदलू शकतील अशा महिलांसमोर अंत्योदयाच्या विविध योजनांचा उल्लेख पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात केला. सर्वसाधारणपणे मतदानाच्या वेळी पुरुष जसे सांगेल तसे महिलांचे मतदान होत असे. गेल्या काही वर्षांत यात बदल दिसून आले आहेत. मात्र, अजूनही सर्व महिला त्यांचे राजकीय मत स्पष्टपणे व्यक्त करीत नाहीत. त्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून राजकीय पेरणी केली जावी असे पक्षांना वाटत असते. विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला योजनांची जंत्री वाचत केंद्र सरकार महिलांना केंद्रबिंदू मानून काम करत आहे, संदेश दिला गेला.

मात्र, औद्योगिक वसाहतीत त्यांनी केलेले भाषण उद्योग जगतात उत्साह निर्माण करणारे नव्हते.

उद्योगक्षेत्रातील मंडळींना त्यातून काहीएक हाती लागले नाही. मराठवाडय़ासारख्या अविकसित भागात उद्योगांनी अधिक रुजावे वाढावे यासाठी सरकारकडून खूप काही मिळेल अशी अपेक्षा ज्यांना होती, त्यांना निराशेला सामोरे जावे लागले. ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांसमोर दोनदा भाषण केले.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रास्ताविकाचाही मान त्यांच्याकडे होता. पंतप्रधान येण्यापूर्वीही त्यांनी महिला बचत गटातील सदस्यांना मार्गदर्शन केले. मात्र, कार्यक्रमास उपस्थित उद्योगमंत्र्यांना बोलण्याची संधी काही मिळाली नाही. ‘डीएमआयसी’मुळे भारतीय उद्योगाला आणि अर्थचक्राला कशी गती मिळेल हे अधिक विस्ताराने कळू शकेल, असे पंतप्रधानांच्या भाषणातून उमजेल, असे अनेकांना वाटत होते. मात्र, पंतप्रधानांनी महिलांच्या योजनांवर अधिक लक्ष असल्याचा संदेश देणारे भाषण केले.

बचत गट मेळाव्यातून शक्तिप्रदर्शन

सर्वसाधारणपणे विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या, की बचत गटाचे मेळावे होतात हे चित्र तसे नवे नाही. मात्र, औरंगाबाद येथे थेट पंतप्रधान मेळाव्याला उपस्थित राहिल्याने बचत गटाची चळवळ बाळसे धरेल, असा दावा सरकारी यंत्रणा करत असली तरी त्यातील राजकारण अधिक ठसठशीतपणे समोर येत होते. बचत गटातील महिलांचा वापर फक्त गर्दी म्हणून केला जातो. हा पूर्वीचा अनुभव आघाडी सरकारच्या काळातही राजकीय कार्यकर्त्यांना येत होता. या वेळी अधिक शिस्तीत आणि मोठय़ा संख्येने महिलांना एकत्रित केले गेले. त्यामुळे ग्रामीण भागाचे बदलू शकतील अशा महिलांसमोर अंत्योदयाच्या विविध योजनांचा उल्लेख पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात केला