News Flash

दररोज बोलणाऱ्या संजय राऊतांबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले….

शिवसेनेकडून दररोज बोलणाऱ्या काही नेत्यांनी दरी वाढवण्याचं काम केलं.

शिवसेनेकडून दररोज पक्षाची भूमिका मांडणारे खासदार संजय राऊत यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहयाद्री अतिथिगृहावरील पत्रकार परिषदेत चांगलाच समाचार घेतला. त्यांनी नाव न घेता राऊतांवर टीका केली. शिवसेनेकडून दररोज बोलणाऱ्या काही नेत्यांनी दरी वाढवण्याचं काम केलं. बोलण्यामुळे त्यांना मीडिया स्पेस नक्की मिळते पण अशा बोलण्याने सरकार बनत नाही.

तुम्ही ज्या भाषेत बोलता त्या भाषेत आम्हाला उत्तर देता येत नाही असं समजू नका. आम्ही सुद्धा तुमच्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. पण आम्हाला अशा पद्धतीचं बोलणं शोभत नाही अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

आम्ही तोडणारी नाही जोडणार लोक आहोत. आम्ही आमची मर्यादा कधीच ओलांडली नाही. आम्ही उद्धवजींबद्दल एकही वक्तव्य केलं नाही. गेल्या दहा दिवसात नरेंद्र मोदींवर ज्या खालच्या दर्जाची टीका झाली. त्यामुळे अशा सरकारमध्ये सोबत रहाव का? हा प्रश्न माझ्या मनात आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 5:06 pm

Web Title: maharashtra cm devendra fadnavis slam sanjay raut dmp 82
Next Stories
1 निकालाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी केलेले ते विधान आमच्यासाठी धक्कादायक होते: फडणवीस
2 50:50 मुख्यमंत्री कधीही निर्णय झाला नाही – फडणवीस
3 देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, राज्यपालांकडे केला सुपूर्द
Just Now!
X