News Flash

काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली घोषणा

बाळासाहेब थोरात

काँग्रेसकडूनच विधीमंडळ नेतेपदी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. आज काँग्रेस आमदारांच्या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी याबाबत घोषणा केली आहे.  राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदावरून अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावावरून वाद सुरू आहे. तर भाजपा व शिवसेनेने आपले विधीमंडळ नेते निवडलेले आहेत.

विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळाच्या सचिवालयामध्ये जयंत पाटील यांचीच नोंद असल्याची माहिती विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांच्याद्वारे समोर आल्याने भाजपाला हा धक्का असल्याचे बोलले जात होते. मात्र, अजित पवार हेच राष्ट्रवादीचे गटनेता असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आलेला आहे.

राज्यातील सरकार स्थापनेतील पेचावर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला आहे. लोकशाही मूल्यांचं संरक्षण होणं आवश्यक आहे. लोकांना चांगलं सरकार मिळणं हा मुलभूत अधिकार असून, न्यायालयाला काही आदेश देणं गरजेचे आहे. तसेच घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतेही गुप्त मतदान न घेता उद्याच (27 नोव्हेंबर) बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 11:21 am

Web Title: maharashtra congress president balasaheb thorat to be congress legislative party leader of maharashtra msr 87
Next Stories
1 SC Orders Floor Test in Maharashtra :उद्याच्या उद्या बहुमत घ्या, गुप्त मतदान नको; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2 पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावरील दोन लेन तीन तास बंद राहणार
3 अजित पवार की जयंत पाटील? राष्ट्रवादीचा गटनेता कोण?; विधानसभा सचिव म्हणतात…
Just Now!
X