सांगोला विधानसभा मतदारसंघातून शेकाप तर्फे गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ अनिकेत देशमुख यांनी अर्ज दाखल केला. याआधी जाहीर झालेले भाऊसाहेब रुपनर यांनी अर्ज दाखल केला नाही. सांगोला विधानसभा मतदारसंघातून शेकाप मधील उमेदवारीचा वाद आणि गणपतराव यांचा वारसदार कोण ? यावर आता पडदा पडला आहे. गणपतराव यांचे नातू डॉ अनिकेत चंद्रकांत देशमुख यांना उमेदवारी दिली. आणि डॉ देशमुख यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केला.

डॉ देशमुख यांचे नाव येण्याआधी भाऊसाहेब रुपनर यांचे नाव घोषित झाले होते. त्यांच्या नावाला कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यामुळे उमेदवारी मध्ये बदल करीत नातवाला पुढे आणले. त्यामुळे मतदारसंघात उलट सुलट चर्चा सुरु झाली. या बाबत शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांनी शेकापवर सडकून टीका केली.

congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
महायुतीचं सरकार टिकणार नाही? अजित पवार गटातील आमदाराच्या वक्तव्याने खळबळ; भाजपा नेत्याला म्हणाले, “मी सुरूंग लावून…”
BJP manifesto 2024 Sankalp Patra continuity amid change
भाजपाच्या जाहीरनाम्यात नवीन काय? कुठले मुद्दे वगळले? कशाबाबत मौन?
cm eknath shinde
शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता; भाजपच्या दबावामुळे उमेदवारी मिळण्याबाबत साशंकता

शेकाप मध्ये देखील घराणेशाही सुरु झाली आहे. गणपतराव यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज असताना उत्तराधिकारी म्हणून नातवाला निवडले, अशी टीका सेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांनी केली. गणपतराव आणि शेकाप कडे कार्यकर्त्यांची फौज आहे. जर रुपनर यांना विरोध होता. तर दुसरा कोणी तरी कार्यकर्ता निवडायचा? रुपनर यांचा बळीचा बकरा केल्याची टीका यावेळी शहाजीबापू पाटील यांनी केली.यंदाच्या निवडणुकीत बदल होऊन युतीचा भगवा फडकणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तर दुसरीकडे सांगोल्यातून युतीमध्ये देखील बंडखोरी झाली आहे. भाजपाच्या इच्छुक राजश्री नागणे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. या आधी दीपक साळुंखे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक अतितातीची होईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत.