25 February 2021

News Flash

राष्ट्रवादीच्या बैठकीआधी शरद पवार लिलावतीमध्ये, रोहित पवारांसह घेतली संजय राऊतांची भेट

सत्तास्थापनेसाठी आजचा दिवस निर्णायक

शरद पवार (संग्रहित)

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा अभूतपूर्व पेचप्रसंग निर्माण झालाय. शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा फोल ठरल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. परिणामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. सत्तास्थापनेसाठी आजचा दिवस निर्णायक मानला जात आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या आज महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. अशातच शरद पवार यांनी शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांची लिलावती रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतलीये.

शरद पवार आणि नवनिर्वाचीत आमदार रोहित पवार यांनी संजय राऊत यांची आज(दि.१२)सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास लिलावती रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. जवळपास १५ मिनिटं पवार लिलावतीमध्ये होते, यावेळी त्यांनी राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवारांसोबत खासदार सुप्रिया सुळे यादेखील होत्या अशी माहिती आहे . राऊत आणि पवार यांच्यामध्ये यावेळी काही खलबतं झाली की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पण राऊत यांच्या भेटीनंतर पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीसाठी रवाना झाल्याची माहिती आहे. सत्तास्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची आज ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवारांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक होत आहे. त्यापूर्वी शरद पवार संजय राऊत यांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचले होते. दरम्यान, शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना रात्री उशीरा फोन करुन शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याची तयारी दर्शवल्याचं समजतंय. आज, मंगळवारी मुंबईत पोहोचणारे काँग्रेसचे नेते अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाळ आणि मल्लिकार्जुन खरगे यांची शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांशी चर्चा होऊन शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याच्या मुद्यावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, तीन पक्षांच्या संभाव्य सरकारचे नेतृत्व ठरल्यानुसार शिवसेनेकडेच सोपविले जाईल काय, यावर सोमवारी काँग्रेसच्या पवित्र्यामुळे प्रश्नचिन्ह लागले आहे.

आणखी वाचा- संजय राऊत यांचं रुग्णालयातून ट्विट; अजून हार मानली नसल्याचे संकेत

गेल्या पंधरा दिवसांपासून शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडणारे संजय राऊत यांच्यावर सध्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळल्यानंतर प्रथम त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली,नंतर  त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.  सोमवारी दुपारच्या सुमारासच त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 10:32 am

Web Title: maharashtra government formation ncp sharad pawar meets shiv sena sanjay raut in lilavati hospital sas 89
Next Stories
1 शिवसेनेच्या समर्थनावरून आघाडीतच जुंपली
2 शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन दोन्ही काँग्रेसमध्ये काय घडलं?, अजित पवार म्हणाले…
3 संजय राऊत यांचं रुग्णालयातून ट्विट; अजून हार मानली नसल्याचे संकेत
Just Now!
X