07 March 2021

News Flash

संजय राऊत यांचं रुग्णालयातून ट्विट; अजून हार मानली नसल्याचे संकेत

हम होंगे कामयाब..

गेल्या पंधरा दिवसांपासून शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर सध्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती बरी नसतानाही संजय राऊत यांनी रुग्णालयातून ट्विट करत शिवसेनेनं हार मानली नसल्याचे संकेत दिले आहेत. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या ओळी ट्विट करून आम्ही यशस्वी होणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरलेल्या शिवसेनेची बाजू खासदार संजय राऊत जोमानं मांडत आहेत. दरम्यान, शिवसेनेला सत्ता स्थापनेच आमंत्रण मिळाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सोमवारी सुरू होते. या सर्व घडामोडींमध्ये संजय राऊत आघाडीवर होते. मात्र, दुपारी अचानक यांना संजय राऊत लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून छातीत वेदना होत असल्याने आज शिवसेना खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. सोमवारी रात्री राऊत यांच्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळून आले.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून समर्थनाचे वेळेत पत्र न मिळाल्यानं शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही. मात्र, संजय राऊत यांनी रुग्णालायतूनच ट्विट केलं आहे.

“लहरों से डर कर नौका पार नहीं होती,

कोशीश करने वालों की कभी हार नही होती ।’

-बच्चन.

हम होंगे कामयाब.. जरूर होंगे…”

असं ट्विट करत राऊत यांनी शिवसेनेनं सत्ता स्थापन करण्यातून अजून हार मानलेली नाही. आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यात यशस्वी होऊ, असा विश्वास राऊत यांंनी ट्विट मधून व्यक्त केला आहे.

भाजपानं शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्यास नकार दिल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेत टीका केली होती. त्यांनी पत्रकार परिषदा घेेऊन आणि सामनाच्या अग्रलेखातून काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीका केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 9:46 am

Web Title: maharashtra government formation shiv sena leader sanjay raut tweet from hospital bmh 90
Next Stories
1 “आज बाळासाहेब असते तर त्यांना दु:ख झालं असतं”
2 बाळासाहेबांना वचन तुम्ही दिलं होतं, शरदराव आणि सोनियांनी नाही!; भाजपाचा उद्धव यांना टोला
3 शिवसेनेची कोंडी झाल्यानंतर नितेश राणेंना हसू आवरेना, म्हणाले…
Just Now!
X