विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात फक्त बैठकांचा धडाका सुरू आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. भाजपानं सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला आमंत्रण दिलं. शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही काँग्रेसनी वेळेत निर्णय न घेतल्यानं शिवसेनेला दावा करता आला नाही. आता राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं आहे. पण, बहुमतासाठी लागणारा आकडा काँग्रेसला सोबत घेऊन राष्ट्रवादीला जमवता येणार नाही. त्यामुळं राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरू झाली आहे. राष्ट्रपती राजवट म्हणजे नेमकं काय याचं विश्लेषण करणारा हा व्हिडीओ
भाजपा वगळता कोणत्याही पक्षाला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. दोन्ही काँग्रेस मिळून शंभरी पार करतात. मात्र, बहुमतासाठी लागणाऱ्या आकड्याची जुळवा जुळव करण्यासाठी दुसरा समविचारी पक्ष नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळं शिवसेना पाठिंबा देणार का? असाही प्रश्न सध्या आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2019 9:17 am