X
X

#मोदी_परत_जा : का होतोय पंतप्रधानांना महाराष्ट्रातूनही विरोध?

नेटकऱ्यांनी आता मराठीतून हॅशटॅग सुरू करून पंतप्रधानांना विरोध सुरू केला आहे.

राज्यात विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच अनेकांच्या प्रचारसभांनीही राज्यात जोर धरला आहे. शेजारी राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री अमित शाह आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील महाराष्ट्रात सभांसाठी हजेरी लावत आहेत. अशातच मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे.

रविवारी सकाळपासूनच ट्विटरवर #मोदी_परत_जा हा मराठी हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्याला सोशल नेटवर्किंगवरून विरोध होत असल्याचं चित्र सध्या पहायला मिळत आहे. अनेकांनी या हॅशटॅगच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी राज्यातील प्रश्न उपस्थित करून ‘मोदी परत जा’ असं म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी महाराष्ट्रात येऊन कलम ३७० वर बोलण्यापेक्षा राज्यातील समस्यांवर बोलावं अशी मागणी या हॅशटॅगच्या माध्यमातून केली आहे. तर पाहुयात काही व्हायरल झालेले ट्विट.मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीपूर्वी #GoBackModi हा हॅशटॅग मोदींच्या तामिळनाडू दौऱ्याआधी ट्विटवर ट्रेंड होताना दिसून आला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी तामिळनाडूला गेले होते त्यावेळेसही त्यांना विरोध झाला होता. जानेवारी महिन्यामध्ये मोदी यांनी मदुराई येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हाही त्यांना विरोध झाला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये ते चेन्नई येथे आयआयटीमध्ये पदवीदान समारंभाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यावेळीही मोदींना विरोध करण्यात आला होता. केवळ भारतातच नाही तर चीनमधूनही मोदींच्या तामिळनाडू भेटीला विरोध होताना दिसला होता. चीनमध्येही हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसला. चीनमधील नेटकऱ्यांनी मोदी परत जा या अर्थाचा #回到莫迪 (Huí dào mò dí) हा हॅशटॅग वापरुन मोदींना विरोध करणारे ट्विट केले होते.

21

First Published on: October 13, 2019 3:54 pm
Just Now!
X