राज्यात विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच अनेकांच्या प्रचारसभांनीही राज्यात जोर धरला आहे. शेजारी राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री अमित शाह आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील महाराष्ट्रात सभांसाठी हजेरी लावत आहेत. अशातच मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. रविवारी सकाळपासूनच ट्विटरवर #मोदी_परत_जा हा मराठी हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्याला सोशल नेटवर्किंगवरून विरोध होत असल्याचं चित्र सध्या पहायला मिळत आहे. अनेकांनी या हॅशटॅगच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी राज्यातील प्रश्न उपस्थित करून 'मोदी परत जा' असं म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी महाराष्ट्रात येऊन कलम ३७० वर बोलण्यापेक्षा राज्यातील समस्यांवर बोलावं अशी मागणी या हॅशटॅगच्या माध्यमातून केली आहे. तर पाहुयात काही व्हायरल झालेले ट्विट. आज झालेला #मोदी_परत_जा हा ट्रेंड पाकिस्तानी लोकांनी नाही तर खऱ्या भारतीयांनी केला आहे, आता तरी लाज ठेवा आणि 370 ची फेकाफेकी बंद करा आणि महाराष्ट्र च्या समस्या बद्दल बोला. #मोदी_परत_जा #GoBackModi — Sankesh More (@MaverickSankesh) October 13, 2019 बुलेट् ट्रेन् ऐवजी आमच्या मुंबई लोकलचेच हाल सुधारा, बुलेट् ट्रेन्वर पैसे वाया घालवण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वेचा नेट्वर्क् तयार करा (म्हणजे मुंबई ते गडचिरोली पूर्ण महाराष्ट्र एकत्रित आणता येईल, गुजरातसाठीही तेच करा) जो महाराष्ट्राला लाभदायक ठरेल#मोदी_परत_जा #GoBackModi pic.twitter.com/4I5znGdke8 — Deccan69मराठी/Marathi (@Deccan69Marathi) October 13, 2019 #मोदी_परत_जा शेतकऱ्यांना 2000 च गाजर दाखवलं, महाराष्ट्रात 2000 शेतकरी दाखवा 2000 मिळविलेले। — Dipak Masolkar (@masolkards) October 13, 2019 Series of Events #GoBackModi #मोदी_परत_जा pic.twitter.com/YY4qksn0Wg — RANVEER (@ranveerpol6161) October 13, 2019 It's been nearly 3 years and not a single brick has been laid yet. We're ashamed to have a PM like you. You're not welcomed#मोदी_परत_जा#GoBackModi — RANVEER (@ranveerpol6161) October 13, 2019 We do not want a PM who takes away the benefits of Maharashtra's farmers by exporting goods from time to time and importing goods from enemy nations.#मोदी_परत_जा#GoBackModi @narendramodi @PMOIndia @bjp4mumbai @BJP4Maharashtra pic.twitter.com/eDS9EwVoop — विजय स्वामी (Vijay Swami) (@shyvijay) October 13, 2019 अर्धा महाराष्ट्र दुष्काळात आणि अर्धा महाराष्ट्र पाण्याखाली असतांना. लोकांचे व जनावरांचे बळी जात असतांना. अब्जो रुपयांचे नुकसान होत असतांना. मुंबई मध्ये वृक्ष तोड होत असतांना. मोदीजी आपण कुठे होता ?? #मोदी_परत_जा — Pranjal Gedam (@GedamPranjal) October 13, 2019 देश मे आर्थिक मंदी जिस तरह गोते लगा रही, मोदी जी उसकी तरफ ध्यान दो. हमने आपको देश की तरक्की के लिए चुना है, कचरा साफ करने के लिए नहीं. #मोदी_परत_जा #earthquake #EconomicSlowdown pic.twitter.com/BM5mKMskxg — Janawaj (@Janawaj1) October 13, 2019 मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीपूर्वी #GoBackModi हा हॅशटॅग मोदींच्या तामिळनाडू दौऱ्याआधी ट्विटवर ट्रेंड होताना दिसून आला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी तामिळनाडूला गेले होते त्यावेळेसही त्यांना विरोध झाला होता. जानेवारी महिन्यामध्ये मोदी यांनी मदुराई येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हाही त्यांना विरोध झाला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये ते चेन्नई येथे आयआयटीमध्ये पदवीदान समारंभाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यावेळीही मोदींना विरोध करण्यात आला होता. केवळ भारतातच नाही तर चीनमधूनही मोदींच्या तामिळनाडू भेटीला विरोध होताना दिसला होता. चीनमध्येही हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसला. चीनमधील नेटकऱ्यांनी मोदी परत जा या अर्थाचा #回到莫迪 (Huí dào mò dí) हा हॅशटॅग वापरुन मोदींना विरोध करणारे ट्विट केले होते.