X
X

मनसेही जिंकणार! ‘या’ एक्झिट पोलने दिल्या इतक्या जागा

वैशिष्टय म्हणजे कुठल्याही एक्झिट पोलने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विजयाचे भाकीत केलेले नाही.

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपल्यानंतर लगेचच वेगवेगळया वृत्त वाहिन्यांवर एक्झिट पोल्सचे आकडे जाहीर झाले. सर्वच एक्झिट पोल्सनी राज्यात पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना युतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. सर्वच एक्झिट पोल्सचा अंदाज सारखा असला तरी एक वैशिष्टय म्हणजे कुठल्याही एक्झिट पोलने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विजयाचे भाकीत केलेले नाही.

प्रत्येक निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही मनसेचा प्रचार आणि उमेदवारांची जोरदार चर्चा होती. राज ठाकरे यांची प्रत्येक प्रचारसभा चर्चेचा विषय ठरली. आपली ठाकरी शैलीत विरोधकांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. पण एक्झिट पोल्सचे आकडे समोर ते मनसैनिक आणि राज ठाकरेंसाठी फारसे उत्साहवर्धक नव्हते.

मनसेला एकाही जागा न दिल्याबद्दल सोशल मीडियावर अनेक मनसे समर्थकांनी आपली नाराजीही जाहीर केली व एक्झिट पोल्सच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. या सर्व एक्झिट पोल्समध्ये पोल डायरीचा एक्झिट पोल हा अपवाद आहे. या एकमेव एक्झिट पोलने या निवडणुकीत मनसेला एक ते पाच दरम्यान जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.

भाजपाला १२१ ते १२८, शिवसेनेला ५५ ते ६४, काँग्रेस ३९ ते ४६, राष्ट्रवादी काँग्रेसला ३५ ते ४२, वंचित बहुजन आघाडीला १ ते ४, मनसेला १ ते ५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. त्याशिवाय २५ विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढाई होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

काय म्हणतो पोल डायरी एक्झिट पोल

विर्दभ – विदर्भात भाजपाला ४० ते ४८, शिवसेनेला ४ ते ८, काँग्रेसला ९ ते १३, राष्ट्रवादीला १ ते ५ आणि मनसेला ० ते २ दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

पश्चिम महाराष्ट्र – पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला २३ ते ३१, शिवसेनेला ५ ते ११, काँग्रेसला ७ ते १४, राष्ट्रवादीला १५ ते २१ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.

उत्तर महाराष्ट्र – उत्तर महाराष्ट्रात भाजपाला १८ ते २२, शिवसेनेला ९ ते १५, काँग्रेस ८ ते १२ आणि राष्ट्रवादीला ८ ते १३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

मराठवाडा – मराठवाडयात भाजपाला १४ ते १८, शिवसेनेला १९ ते १३, काँग्रेसला ९ ते १४, राष्ट्रवादीला ६ ते ११ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.

कोकण – कोकणात भाजपाला २६ ते २९, शिवसेनेला २८ ते ३२, काँग्रेसला ६ ते १० आणि राष्ट्रवादीला ५ ते ११ दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.