Maharashtra Vidhan Sabha Election 2019:राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असून अनेक दिग्गज लढतींकडे लक्ष आहे. यामधील एक महत्त्वाची लढत म्हणजे नितेश राणे यांची आहे. नितेश राणे यांना भाजपाकडून कणकणवलीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत नितेश राणे यांनी आघाडी घेतली आहे. नितेश राणे यांच्यासह नारायण राणे यांनी आपला मोठ्या फरकाने विजय होईल असा विश्वास अनेकदा व्यक्त केला आहे. नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनी ८० टक्के मत आपल्याला मिळतील असा दावा केला होता.

शिवसेना-भाजपाच्या महायुतीत वादग्रस्त ठरलेल्या जागेपैकी एक म्हणजे कणकवली मतदरासंघ आहे. भाजपाने नितेश राणे यांना उमेदवारी दिली असली ती शिवसेनेकडून आपला उमेदवार देण्यात आला आहे. नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे ही निवडणूक शिवसेना विरुद्द भाजपा अशी आहे.

Udayanraje bhosale
साताऱ्यात उदयनराजेंचीच कॉलर टाईट! भाजपाने जाहीर केली लोकसभेची उमेदवारी
vbt local office bearers oppose vasant more name for pune lok sabha constituency
lokSabha Election 2024 : वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यास वंचितच्या पुण्यातील नेत्यांचा विरोध
amravati loksabha constituency
अमरावतीत बच्चू कडूंचा ‘प्रहार’; नवनीत राणांविरोधात ठाकरे गटाच्या नेत्याला दिली उमेदवारी
Lok Sabha Elections 2024 : प्रस्थापितांना भाजपचा धक्का; वरुण गांधी, अनंतकुमार हेगडेंना डच्चू

कणकवलीत काँग्रेसकडून सुशील राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेकडून राजन दाभोळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नितेश राणे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा पार पडली होती. यावेळी नितेश राणे यांनी अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. कणकवली या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारसभेसाठी दाखल होताच नारायण राणे यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. कणकवलीतून नितेश राणे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. आज त्यांचा भाजपात प्रवेश झाला. या दिवसाची मी फार दिवस वाट पाहात होतो असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. माझ्यासह निलेश राणे, नितेश राणे यांचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश झाला असे मी जाहीर करतो असंही नारायण राणे यांनी स्पष्ट केलं होतं.