विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहे. त्यातच भाजपाच्या रम्याने आज पुन्हा एक एकदा डोस दिला आहे. रम्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पैलवानावरून केलेल्या विधानाला उत्तर देताना पवारांचा हात ढळला. त्यानंतर पवारांच्या हातवाऱ्यावरून भाजपाकडून टीकेची झोड उडवण्यास सुरूवात झाली. आम्ही नटरंगसारखे काम केलं नाही, त्यामुळे आम्ही उत्तर देणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. पवारांच्या हातवाऱ्यावरून भाजपाने व्यंगात्मक टीका केली आहे.

गेल्यावेळी सत्ता पुतण्याच्या वक्तव्यामुळे गेली होती. यावेळी काकांच्या हातवाऱ्यामुळे जाणार असल्याचा डोस भाजपाच्या रम्याने राष्ट्रवादीला दिला आहे. अजित पवार यांनी सत्तेत असताना ‘धरणात पाणी नाही तर….’ केलेल्या या वादग्रस्त वक्तव्याची शिकवण घरातूनच मिळाल्याचा खोचक टोमणा रम्याने लगावला आहे.

सोलापूरमधील देशमुख नावाच्या शेतकऱ्याने आघाडी सरकारच्या काळात मुंबईत पाणी मिळावे म्हणून उपोषण केले होते. तेव्हा या उपोषणाची खिल्ली उडविताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाणीच नाही तर सोडणार कुठून, असा सवाल करताना काय लघुशंका करायची का, असे विधान केले होते.

नेमकं काय म्हटलेय रम्याचे डोसमध्ये?

अरे हे बारामतीवाले साहेब मुख्यमंत्र्यांना उत्तर देताना म्हणाले , ”कुस्ती ही पैलवानांशी होते, अशांशी नाही” आणि हे बालताना चक्क ‘सूचक’ हातवारे केलेत त्यांनी किती घसरलेत साहेब!

तरीच दादा जेव्हा धरण भरण्याची खालच्या पातळीवरची भाषा बोलले तेव्हा मी विचार करयचो की हे येतं कुठून? आता समजलं त्यांची खरी गंगोत्री तर घरातच आहे.