News Flash

मतदानावेळी तेंडुलकरला पाहून क्रिकेटवेड्या पोलिंग ऑफिसरने केलं ‘हे’ कृत्य

मतदानासाठी पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुन तेंडुलकरसोबत सचिन वांद्रे पश्चिमेतील मतदान केंद्रावर पोहोचला होता.

(वांद्रे पश्चिमेतील मतदान केंद्रावर दुपारच्या सुमारास पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकरसोबत सचिन पोहोचला होता.)

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघांमध्ये सोमवारी(दि.21) मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. सर्वसामान्यांपासून राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार, क्रिकेटपटूंनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. यावेळी भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही मतदान केलं. पण, मतदानासाठी मतदान केंद्रावर आलेल्या सचिन तेंडुलकरसोबत एक एक मजेशीर प्रसंग घडला.

वांद्रे पश्चिमेतील मतदान केंद्रावर दुपारच्या सुमारास पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकरसोबत सचिन पोहोचला होता. सचिनला मतदान केंद्रावर आल्याचं पाहताच एक पोलिंग अधिकारी लेदरचा बॉल घेऊन सचिनकडे गेला आणि त्या बॉलवर सचिनची स्वाक्षरी मागितली. सचिननेही त्या अधिकाऱ्याला निराश केलं नाही आणि त्या लाल रंगाच्या बॉलवर स्वाक्षरीही केली. आवडत्या क्रिकेटपटूची स्वाक्षरी मिळाल्याने पोलिंग ऑफिसरचा आनंदही द्विगुणीत झाला.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सचिननं कुटुंबासोबत फोटोदेखील काढला. मात्र सचिनची मुलगी सारा तेंडुलकर मतदानाला आली नाही. ती परदेशात असल्याने मतदानासाठी उपस्थित राहू न शकल्याची माहिती आहे. ती सध्या लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. त्यामुळेच तिला मतदानासाठी मुंबईमध्ये येता आले नसल्याची माहिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 12:20 pm

Web Title: maharashtra vidhansabha election 2019 sachin tendulkar signed a ball at polling booth bandra for polling officer sas 89 2
Next Stories
1 64MP कॅमेरा! पहिल्या सेलमध्ये काही सेकंदातच Out Of Stock, ‘रेडमी नोट 8 प्रो’साठी पुन्हा सेल
2 …म्हणून सारा तेंडुलकरने केले नाही मतदान
3 ‘मी तुमची तक्रार करेन’, मतदानानंतर निवडणूक अधिकाऱ्यावर भडकल्या जया बच्चन
Just Now!
X