27 May 2020

News Flash

मतदान करा आणि हॉटेल बिलात मिळवा सवलत

मतदान केल्याची बोटावरील शाईची खूण दाखवावी लागणार

अमरावती हॉटेल अॅ,न्ड रेस्टॉरंट असोसिएशनने मतदान करणाऱ्यांसाठी मतदानाच्या दिवशी बिलावर दहा टक्के सूट देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी मतदान केल्याची बोटावरील शाईची खूण दाखवावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मतदार जनजागृती करण्याच्या दृष्टीने महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद हा निर्णय घेतला आहे.

जिल्हानधिकारी शैलेश नवाल व अमरावती महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी हॉटेल अँन्ड रेस्टॉरंट असोसिएशनला यासंदर्भात आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत असोसिएशनचे अध्यक्ष गजानन राजगुरु यांनी १० टक्क्यांची सूट देण्याचे पत्र प्रशासनाला दिले.मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत.

लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांसाठी हॉटेल अँन्डे रेस्टॉरंट असोसिएशन मार्फत बिलात सुट देण्यात येणार आहे. यासाठी मतदारांना पुरावा म्हणून शाई लावलेले बोट दाखविणे आवश्यक आहे. महापालिका आयुक्तांनी हॉटेल अॅ न्ड रेस्टारंट असोसिएशनच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2019 9:41 am

Web Title: maharshtra vidhansabha election 2019 hotel bill voting discount nck 90
Next Stories
1 ‘त्या’ वक्तव्यावरून धनंजय मुंडेंचा खुलासा
2 धनंजय मुंडेंविरोधात परळीत गुन्हा दाखल
3 नालासोपाऱ्यात प्रदीप शर्मा यांच्यावर पैसे वाटल्याचा बविआचा आरोप
Just Now!
X