प्रशासनाने चांगले काम केल्यास मी अभिनंदनही करेन. मी कोत्या मनाचा नाही. केंद्र सरकारच्या कारभारवर टीका केली, तरी कलम ३७० रद्द केल्यावर शुभेच्छाही दिल्या. असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेमध्ये केलं. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह महाराष्ट्रातील समस्यांवर का बोलत नाहीत, असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे यांनी यावेळी महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच झापले. लोक ट्रेनमधून पडतात, मरतात पण तुम्हाला त्याचे काहीच नाही. राज्यात इतक्या गोष्टी घडूनही आपला महाराष्ट्र थंड, लोण्याचा गोळ्यासारखा. आम्हाला राग यायचाच बंद झाला आहे. आम्हाला कोणाचीही किंमत नाही. लोक मरतायत मरू द्या. तुमच्यात आरे ला कारे करण्याची धमक नाही. तुमच्यामध्ये ती आगच नाही. अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला. आई-वडिलांनी जन्म दिला म्हणून जगायचे, अशा लोकांचे नेतृत्व करायचे नसल्याचे ते म्हणाले.

काही समस्या असल्या की सोडवायला मनसेकडे येता. तशी काम करणाऱ्या माणसाच्या पाठीवर मतांची थाप द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

 

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे –
बहुमताच्या आधारावर लहर आली म्हणून नोटा बंद
रिझर्व्ह बँकेने २ हजारच्या नोटांची छपाई बंद झाल्याचे वृत्त आहे. म्हणजे आता पुन्हा तुम्ही रांगेत उभे राहणार
निवडणुका गांभीर्याने घेत नाही, तोपर्यंत तुमच्या नशिबी हेच येणार
शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देताना जात का पाहिली जातेय
खुल्या प्रवर्गाच्या मुलांना प्रवेशासंदर्भात आश्वासन द्या
आपल्या राज्यात शिक्षकांना अजिबाद किंमत नाही
भारतातून सर्वाधिक स्थलांतरित लोकं ठाणे जिल्ह्यात
जातीपातीच्या राजकारणामुळे विकास खुंटला
मनसेच्या आंदोलनानंतर मोबाइलवर मराठी भाषेची सेवा