विधानसभा निवडणुकीचा शिवसेनेचा वचननामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते शनिवारी प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये अनेक घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. ‘लाखो लोकांशी चर्चा करून जाहीरनामा तयार केला आहे. या जाहीरनाम्यात मी विचारपूर्वक वचनं दिली आहेत. तसेच राजाच्या तिजोरीवर किती भर पडेल याचा विचार करूनच हा वचननामा तयार केला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.’ “सर्वांच्या मागण्यांचा आणि सर्व बाबींचा विचार करून हा वचननामा तयार करण्यात आला आहे. हा वचननामा तयार करताना महिला वर्गांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये बारकोडही देण्यात आला आहे,” असं मत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं. दहा रुपयांत थाळी, एक रुपयात आरोग्य चाचणी, विज बिल कपात अशा अनेक घोषणांचा पाऊस शिवसेनेच्या वचननाम्यात करण्यात आला आहे.

वचननाम्यातील दहा आश्वासनं-

drowning to death
अमेरिकेपाठोपाठ स्कॉटलंडमधून वाईट बातमी, दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
students election duty marathi news
निवडणुकीच्या कामासाठी आता विद्यार्थ्यांचीही नियुक्ती

– दहा रुपयांत गोरगरीबांना अन्न
– शेतकऱ्यांच्या दरवर्षी दहा हजार रुपये
– शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार
– खतांचे दर पाच वर्ष स्थिर राहतील अशी व्यवस्था करणार
– घरगुती वापराच्या विजेवर 30 टक्के पर्यंत दर कमी करणार
– एक रुपयात होणार आरोग्य चाचण
– ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विशेष बसेसची सोय
– तीर्थक्षेत्रांच्या प्रवासासाठी समन्वय केंद्रांची स्थापना
-कोकण प्राधिकरणाची स्थापना करणार
– आशा वर्कर, आंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवणार