19 November 2019

News Flash

शिवसेना आणि भाजपा यांच्यातला तिढा सुटण्याची चिन्हं-सूत्रं

मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देण्याची तयारी सुरु

शिवसेना आणि भाजपा यांच्यातला तिढा सुटण्याची चिन्हं आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनिमित्त पत्रकारांशी बोलताना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद अशी काही चर्चा झालीच नव्हती असं वक्तव्य केलं होतं. तिथूनच भाजपा आणि शिवसेनाचा वाद सुरु झाला. हे वक्तव्य मागे घेण्यासाठी एक ड्राफ्ट तयार होतो आहे असं समजतं आहे. याच वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं जाईल आणि जो दोन पक्षांमध्ये तिढा निर्माण झाला आहे तो सोडवण्यासाठी या वाटाघाटी सुरु आहेत असं सूत्रांचं म्हणणं आहे.

२४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक निकाल लागला. या निकालात भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. मात्र शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिवाळीच्या दिवशीच्या वक्तव्यानंतर सुरु झाली आहे. संजय राऊत हे रोज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. या सगळ्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये डेडलॉक निर्माण झाला होता हा डेडलॉक सुटण्याची चिन्हं आहेत.

First Published on November 8, 2019 3:36 pm

Web Title: may dispute between bjp shivsena will resolve soon says sources scj 81
Just Now!
X