राष्ट्रवादी काँग्रेसची साथ एकवेळ चालेल मात्र काँग्रेसबाबत थोडे आक्षेप आहेत असं म्हणत राज ठाकरे यांनी त्यांचं मत मांडलं. काँग्रेसबाबतचे आक्षेप काय आहेत ते मात्र त्यांनी सांगितलं नाही. कुणासोबत जायचं हे ठरवायचा निर्णय घ्यायची वेळ आली तर राष्ट्रवादी चालेल असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. सध्या माझा असा कोणताही विचार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.   मी कुणाकडेही युती, आघाडीचा प्रस्ताव घेऊन गेलो नव्हतो, आत्ताही गेलो नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. एबीपी माझा आणि लोकसत्ताच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लाव रे तो व्हिडीओ मुळे तुम्हाला ईडीची नोटीस आली, विरोधी पक्षांनी तुम्हाला सोबत घेतलं नाही त्याबाबत काय सांगाल? असं विचारलं असता राज ठाकरे म्हणाले, ” मी लोकसभेच्या वेळीही सांगितलं होतं की, मी कुणाकडेही युतीचा प्रस्ताव घेऊन गेलो नाही. आता विधानसभा निवडणुकीच्यावेळीही मी कोणाहीकडे युतीचा प्रस्ताव मांडला नाही, सोनिया गांधींना भेटलो तेव्हा पहिलं वाक्य होतं मी हातमिळवणीसाठी आलेलो नाही. युती, आघाडीसोबत जावं असं मला वाटत नाही.” असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

शिवसेना आणि भाजपावर अंकुश ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे मी सक्षम विरोधक म्हणून मनसेला निवडा अशी मागणी मी करतो आहे. अशी मागणी करणारा माझा पहिलाच पक्ष आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ईव्हीएमवर बहिष्कार टाकला पाहिजे ही तुमची भूमिका आहे मात्र ती मान्यच झाली नाही त्याबद्दल काय सांगाल? असं विचारलं असता आजही बॅलेट पेपरवर निवडणूक लढवली गेली पाहिजे असं मला वाटतं. माझा आजही ईव्हीएमला विरोध आहे. मात्र करणार काय? कारण त्याबाबत संभ्रम आहे. माझे उमेदवार निवडून येतीलही पण बॅलेट पेपरचा आग्रह गैर काय? असं राज ठाकरेंनी विचारलं आहे.

जपान, नेदरलँड या ठिकाणी बॅलेट पेपरवर व्होटींग होतं. मग आपण ईव्हीएम का करतो आहोत? मी कुणाला मत दिलं आहे ते मला कळलं पाहिजे ही मागणी मी करतो आहे, त्यात चुकीचं काय? असंही राज यांनी विचारलं. मला अपेक्षित असलेली मतं मिळाली, माझे उमेदवार निवडून आले तर मी समजेन की सरकार बेसावध राहिलं. ईडीची नोटीस आली त्याच्याने मला काही फरक पडत नाही. निवडणुकीच्या तोंडावर यांना शरद पवार आठवले, अजित पवार आठवले, आता ईडीलाही राजकारण जमू लागलं का? असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. व्हिडीओ का मिसिंग आहेत ? असं विचारलं असता, सारखं सारखं तेच तेच प्रकार का करायचे?

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: May i will go with ncp but not with congress says raj thackeray scj
First published on: 14-10-2019 at 18:30 IST