वंचित बहुजन आघाडीला १०० जागांचा प्रस्ताव देणाऱ्या एमआयएमने ७४ जागांवर तडजोड करण्याचे ठरविले होते. पण दोन्ही पक्षांत जागा वाटपावरून मतभेद  झाल्यानंतर ती आघाडी तुटली आणि एमआयएमच्यावतीने नवीन रणनीती आखली जात आहे. राज्यातील साधारण ५० जागांवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सांगितले.

मालेगाव, जळगाव, हिंगोली, औरंगाबाद पूर्व, सोलापूर, भायखळा, चांदिवली, उदगीर या आठ जागा एमआयएमला देऊ, असे वंचित बहुजन आघाडीकडून कळविण्यात आल्यानंतर एमआयएमने निवडणुकीच्या रिंगणात स्वतंत्र उमेदवार देण्याचे ठरविले. गेल्या निवडणुकीत ३४ जागा एमआयएमने लढविल्या होत्या.