28 May 2020

News Flash

खासदार  इम्तियाज जलील यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्क्की

खासदार इम्तियाज यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. त्यामुळे तणाव अधिक वाढला.

 

एमआयएम-राष्ट्रवादी कार्यकर्ते भिडले; पोलिसांचा लाठीमार

औरंगाबाद मध्य मतदारसंघातील कटकट गेट परिसरातील केंद्रावर बोगस मतदान करण्याचा डाव उधळल्याच्या कारणावरून एमआयएम व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सोमवारी सायंकाळी हाणामारी झाली, यात दोघे जखमी झाले. या वेळी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेले एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील व राष्ट्रवादीचे उमेदवार कदीर मौलाना आणि त्यांच्या सोबतचे असलेले एमआयएमचे माजी पदाधिकारी अज्जु पहेलवान यांच्यातही शाब्दिक बाचाबाची झाली. खासदार इम्तियाज यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. त्यामुळे तणाव अधिक वाढला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी कटकट गेट, रोशनगेट, चंपा चौक परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.

दोन्ही गटाकडील कार्यकर्त्यांकडून जिन्सी आणि सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

हाणामारीच्या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कदीर मौलाना यांच्या निषेधाच्या घोषणा देत एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. या वेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एमआयएमच्या नेतृत्वावर टीका केली. हाणामारीत जखमी झालेल्या दोन कार्यकर्त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर मारहाण करणाऱ्यांना दोन तासात अटक करण्यात आली नाही तर एमआयएम तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा एमआयएमचे खासदार जलील यांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त राहुल खाडे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्या उपस्थितीत होते.

पूर्व मतदारसंघातही तणाव

पूर्व मतदारसंघात एमआयएम व समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. जकातनाका परिसरातील मतदान केंद्रावर टेबल लावण्यावरून दोन्ही गटातील कार्यकर्ते परस्परांशी भिडले. मात्र, हा तणाव काहींनी मध्यस्थी केल्यामुळे निवळला. या संदर्भात सायंकाळपर्यंत कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 3:05 am

Web Title: mim ncp fight imtiaz jaleel akp 94
Next Stories
1 मराठवाडय़ात हाणामारी
2 Video : बोगस मतदानावरून बीडमध्ये क्षीरसागर आक्रमक
3 औरंगाबादेत ४७.२५ टक्के महिला मतदार
Just Now!
X