कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर काही अज्ञातांनी हल्ला केला. शहरातील समर्थनगर भागात असलेल्या त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. तसंच काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हा हल्ला शिवसेनेकडून करण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर काही अज्ञातांनी दगडफेक करत त्यांच्या गाडीचीही तोडफोड केल्याची घटना मध्यरात्री घडली. दुचाकीवरून आलेल्या काही लोकांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. हर्षवर्धन जाधव हे कन्नड मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी त्यांनी शिवसेनेवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसैनिकांचा रोष वाढला होता. सिल्लोडचे चर्चेत नाही. त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केले असावे, असे सांगण्यात येत आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी विशेष प्रयत्न केले होते.

कन्नड मतदारसंघात शिवसेनेने उदयसिंह राजपूत यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादीकडून संतोष कोल्हे रिंगणात आहेत, तर भाजपचे बंडखोर म्हणून किशोर पवार यांनीही उमेदवारी कायम ठेवल्याने या मतदारसंघातील चुरस वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेली भूमिका अनेक शिवसैनिकांना पटलेली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत तो रोष शिवसैनिक व्यक्त करत होते. त्यात नव्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भर पडणार आहे. हर्षवर्धन जाधव यांनी मिळविलेल्या मतांमुळे एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार झाले. ज्यांच्यामुळे विजय मिळाला, त्यांना मदत व्हावी म्हणून एमआयएमने कन्नड मतदारसंघात उमेदवार दिलेला नाही. उदयसिंह राजपूत यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांना चांगली लढत दिली होती. ते आता शिवसेनेत आले असल्याने कन्नड मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla harshvardhan jadhav house attacked by unknown people wednesday night maharashtra vidhan sabha election 2019 jud
First published on: 17-10-2019 at 08:19 IST