25 November 2020

News Flash

मनसेचे सर्व उमेदवार घेणार राज ठाकरेंची भेट

निवडणुकीत मनसेच्या एकाच उमेदवाराला विजय मिळवता आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातर्फे लढवलेल्या सर्व उमेदवारांची एक बैठक आपल्या निवासस्थानी बोलावली आहे. सकाळी ११ वाजता राज ठाकरे सर्व उमेदवारांची कृष्णकुंजवर भेट घेणार आहेत.

राज्याच्या निवडणुकांमध्ये मनसे सहभागी होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. परंतु अखेरीस राज ठाकरे यांनी आपले १०५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली. पण या निवडणुकीत त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील विजली झाले. पाटील यांच्या रूपात मनसेला केवळ एकच विजय मिळाला.२०१४ च्या निवडणुकीतही मनसेला एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं.

कल्याण ग्रामीणमधून मनसेच्या राजू पाटील यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा ७ हजार मतांनी पराभव केला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात राजू पाटील यांनी बाजी मारली. अनेक ठिकाणी मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाला असला तरी मनसेच्या उमेदवारांनी काँटे की टक्कर दिल्याचं पहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी तर मनसेचे उमेदवार पराभूत होऊनही दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं पहायला मिळालं होतं. दरम्यान, राज ठाकरे आज सर्व उमेदवारांशी चर्चा करणार असून आत्मचिंतनही केलं जाणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2019 10:10 am

Web Title: mns chief raj thackeray to meet all candidates at his residence krishnakunj today maharashtra vidhan sabha election 2019 jud 87
टॅग Result
Next Stories
1 नवी मोट बांधली जाणार असेल तर स्वागतच -अमोल कोल्हे
2 जिंकलो नाही पण संपलो ही नाही ! पोटनिवडणुकीतील पराभवानंतर उदयनराजेंचं ट्विट
3 BLOG : शिवसेना मुख्यमंत्रिपदाचा जुगार खेळणार का?
Just Now!
X