12 November 2019

News Flash

मोदी आणि राहुल गांधी प्रचारासाठी आज राज्यात

मोदी यांची पहिली सभा जळगाव येथे होणार आहे.

विधानसभा निवडणूक २०१९

 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे उद्या राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

मोदी यांची पहिली सभा जळगाव येथे होणार आहे. त्यानंतर भंडारा जिल्ह्य़ातील साकोली मतदारसंघात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. साकोलीत सभा मुद्दामहूनच आयोजित करण्यात आली आहे. भाजप आणि खासदारकीचा राजीनामा दिल्यावर नाना पटोले यांनी सातत्याने भाजप आणि पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले होते. यातून पटोले यांना शह देण्याकरिता मोदी यांची सभा साकोलीत होत आहे. दुसऱ्या टप्प्यात मोदी हे बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची पहिली जाहीर सभा लातूर जिल्ह्य़ातील औसा येथे आयोजित करण्यात आली आहे. २०१४च्या निवडणुकीत औसा येथे राहुल गांधी यांची सभा झाली होती आणि बसवराज पाटील हे विजयी झाले होते. मुंबईत माजी मंत्री नसिम खान यांच्या प्रचाराकरिता चांदिवली तर वर्षां गायकवाड यांच्या प्रचारासाठी धारावीमध्ये सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

First Published on October 13, 2019 1:44 am

Web Title: modi and rahul gandhi in the state today to campaign abn 97