ग्रँड हयात हॉटेलमध्ये फक्त 130 आमदार होते असा दावा आता भाजपा नेते नारायण राणे यांनी केला. त्यांच्या हातात आमदारच नाहीत, असाही आरोप नारायण राणेंनी केला.  ग्रँड हयात या हॉटेलमध्ये 160 आमदार नव्हते तर 130 आमदारच उपस्थित जे आमदार आले नाहीत त्यातला सगळ्यात मोठा खड्डा शिवसेनेला पडला आहे. अनेक आमदार विधान परिषदेचे होते असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हा दावा केला. एवढंच नाही तर सगळ्यात मोठा खड्डा शिवसेनेला पडला आहे. शिवसेनेचे सर्वाधिक आमदार फुटले आहेत असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.

शपथ घेतली त्याबद्दल काय सांगाल? यावर नारायण राणे म्हटले की, ” शपथ घेतली त्यात काय झालं? शपथ घेतल्याने काय होणार आहे? मातोश्रीवर रोज शपथ घेतली जाते त्याचा काय उपयोग? जे आमदार उपस्थित होते त्यांच्यापैकीही किती प्रामाणिक आहेत? हा प्रश्न माझ्या मनात आहे” असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. हयातमध्ये 130 आमदार उपस्थित होते असा दावा नारायण राणेंनी केला आहे.

ग्रँड हयात हॉटेलमध्ये आज महाविकास आघाडीचे आमदार एकवटले होते. आम्ही 162 असा नारा देऊन हे सगळे आमदार आज हयात हॉटेलमध्ये एकवटले होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे आमदार आज एकवटले होते. तिथे सगळ्या आमदारांना एकनिष्ठतेची शपथ देण्यात आली. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी नारायण राणे यांचा दावा खोडून काढला. जितेंद्र आव्हाड यांनी ” काही लोकांना क्षणिक आनंद घ्यायचा असेल तर घेऊदेत. नारायण राणेंचा सल्ला भाजपाने घेतला असता तर भाजपाचं नुकसान झालं नसतं” असा टोला आव्हाड यांनी लगावला.