राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात आज सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली.  महाराष्ट्रात जो सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे त्यावर मार्ग काढण्यासाठी या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी अशी सूत्रांची माहिती आहे. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते समजू शकलेलं नाही. मात्र या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतं आहे.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २० दिवसांपेक्षा जास्त काळ झाला आहे. शरद पवार काय वक्तव्य करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. शरद पवार हे दहा जनपथ या ठिकाणी असलेल्या त्यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. याच ठिकाणी अजित पवारही पोहचले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकीय पेचावर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी अशी शक्यता आहे.