29 September 2020

News Flash

जाणून घ्या किती आहे मुंडे भावा-बहिणीची संपत्ती

परळीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंमध्ये सामना रंगणार आहे.

परळी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही लक्ष्यवेधी ठरणार आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहिण भावामध्येच थेट सामना रंगणार आहे. गुरूवारी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये धनंजय मुंडे यांच्यापेक्षा पंकजा मुंडे यांची संपत्ती अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे ५ कोटी ५४ लाख ७२ हजार रूपये तर धनजंय मुंडे यांच्याकडे ३ कोटी ६५ लाख ६१ हजार २४४ रूपयांची संपत्ती असल्याचं त्यांनी आपल्या शपथपत्रात नमूद केलं आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्याकडे त्यांच्या नावावर कोणतंही वाहन नाही. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे ४५० ग्राम सोनं दीड लाखांचे जडजवाहीर आणि ४ किलो चांदी असल्याचं सांगण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त त्यांनी शेअर्समध्येही मोठी गुंतवणूक केली आहे. तर त्यांचे पती चारूदत्त पालवे यांच्याकडे १४ कोटी ३३ लाख ५५ हजार ४२९ रूपयांची संपत्ती असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. पालवे यांच्या नावावर २५ लाख ४० हजार रूपयांची एक बीएमडब्ल्यू गाडी आहे. त्यांच्याविरोधात कोणताही प्रलंबित खटला किंवा गुन्हा दाखल नसल्याचंही त्यांनी शपथपत्रात नमूद केलं आहे.

धनजंय मुंडे यांच्याकडे ३ कोटी ६५ लाख ६१ हजार २४४ रूपयांची जंगम आणि १ कोटी १४ लाख ९० हजार ५२२ रूपयांची स्थावर मालमत्ता असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. तसंच त्यांच्या नावावर दोन ट्रॅक्टर आणि दोन चारचाकी वाहने आहेत. याव्यतिरिक्त त्यांच्यावर ९ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्याकडे २ कोटी २० लाख ९० हजार ९६४ रूपयांची जंगम आणि २५ लाख १४ हजार ६३५ रूपयांची स्थावर मालमत्ता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 8:41 am

Web Title: ncp dhananjay munde bjp pankaja munde property declared maharashtra vidhan sabha election 2019 jud 87
Next Stories
1 पक्षांतर्गत विरोधक बाजूला काढण्यात मुख्यमंत्र्यांना यश: शिवसेना
2 ‘बविआ’ आघाडीत
3 बंडखोरी आणि समस्यांचे आव्हान
Just Now!
X