26 February 2020

News Flash

त्या ‘चंपा’ला पवारांशिवाय काही दिसत नाही; अजित पवारांनी उडवली खिल्ली

पत्रकारांच्या प्रश्नाला पवारांचं उत्तर

(संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये भाजपाच्या एका मोठ्या आणि दिग्गज नेत्याची खिल्ली उडवली. पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी “त्या ‘चंपा’ला पवारांशिवाय काही दिसत नाही,” अशी टीका केली. त्यानंतर ‘चंपा’ म्हणजे नक्की कोण? याचेही स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले. यावेळी माजी आमदार अण्णा बनसोडे, विलास लांडे, विरोधी पक्ष नेते नाना काटे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पिंपरी-चिंचवडमधील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांच्या “चंद्रकांत पाटील यांनी पवार कुटुंबातील तरुण भविष्यात भाजपमध्ये येऊ शकतात. आले तर त्यांचे स्वागत आहे,” या वक्तव्याचा हवाला देत अजित पवार यांना चंद्रकांत पाटलांविषयी प्रश्न केला.

अजित पवार म्हणाले की, “पवारांच्याशिवाय त्या ‘चंपा’ला काही दिसतच नाही. हा शॉर्ट फॉर्म आहे जस अप म्हणजे अजित पवार, तस चंपा अस त्यांनी यावेळी सांगितलं. त्यांच्या या उत्तरावर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये हास्याची लाट आली. पुढे ते म्हणाले की, ते (चंद्रकांत पाटील) जे काही म्हणतात त्याला काही अर्थ नाही. प्रत्येक वेळेस राजकारणातून शरद पवार दूर जातील अस म्हणतात. शरद पवार यांनी किती चढउतार पाहिले आहे. ५५ आमदारांपैकी ५० आमदार निघून गेले. पाच आमदार राहिले तरीही तितक्याच तत्परतेने बाहेर पडले. आजही तुम्ही पाहता, शरद पवार हे आक्रमक भूमिकेतून हे सरकार बदलायचं अस सांगतात,” असं उत्तर पवार यांनी दिलं.

First Published on October 9, 2019 6:02 pm

Web Title: ncp leader ajit pawar to reply bjp maharashtra president chandrakant patil bmh 90
Next Stories
1 भाजपा आणि आरएसएस नेहमीच पिल्लू सोडतं; सुशिलकुमार शिंदे यांचं टीकास्त्र
2 तेलगी प्रकरणावरुन भाजपाच्या रम्याचे पवारांना डोस
3 पुणे : मतविभागाजनाचा फटका बसून नये म्हणून मनसेला पाठिंबा – अजित पवार
Just Now!
X