छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली हे सरकार सत्तेत आले. परंतु जनतेची फसवणूक करण्याशिवाय या सरकारने पाच वर्षांत काहीच केलेले नाही. नुसता आवळा देऊन कोहळा काढण्याचे काम हे सरकार करत आहे अशी जोरदार टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गोंदिया-सडक अर्जुनी येथील जाहीर सभेत सरकारवर केली.
“७२ हजाराची मेगाभरती आणण्याची घोषणा या सरकारने केली होती. अनेक कंपन्या बंद होत आहेत. तरुणाच्या हाती असलेले रोजगारच निघून जात आहेत मग कुठे गेली मेगाभरती?,” असा सवालही अमोल कोल्हे यांनी केला.
वनरक्षकांची यादी आली यात ‘आंधळं दळतय आणि कुत्र पिठ खातंय’ अशी परिस्थिती झाली आहे. यातील दोन उमेदवार परिक्षेला उपस्थितच नव्हते. तर आज एकीकडे आरटीओ भरती झालेली असतानाही युवकांना आंदोलन करावी लागत आहे. या सरकारने राज्यातील जनतेची कोणतीच स्वप्न पुर्ण केलेली नाहीत. मग या सरकारची नैतिकता आहे का सत्तेत राहण्याची ?,” असा संतप्त सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जनतेला विचारला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 10, 2019 6:30 pm