29 September 2020

News Flash

अजित पवार परततील याचा विश्वास होता : रोहित पवार

संपूर्ण घटनाक्रमावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

आम्हाला अजित पवार परततील याचा विश्वास होता. जे काही घडलं ते कशामुळे घडलं, का घडलं हे माहित नाही. अजित पवार आमचेच आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते परत येतील याचा विश्वास होता. कुटुंबाचे आहेत म्हणून ते परतल्याचा आनंद झाला त्यापेक्षा अधिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आनंद झाला, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा देत सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. राज्यात सरकार स्थापनेसाठी वेळ लागत असल्यानं राज्याच्या कल्याणासाठी आपण भाजपासोबत येऊन सत्ता स्थापन केल्याचं ते म्हणाले होते.

आणखी वाचा- राजकारण वेगळ्या ठिकाणी आणि कुटुंब वेगळ्या ठिकाणी : अजित पवार

या संपूर्ण घटनाक्रमावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार हे परततील याची खात्री होती, असं ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही उल्लेख केला. शरद पवार हे कुटुंबप्रमुख आहे. ते कधीही अस्वस्थ असले तरी ते दाखवत नाहीत. ते यातून मार्ग काढतात. भाजपाला विकासाची निती दिसत नाही. फोडाफोडी करण्याची त्यांची पद्धत आहे. आमच्या कुटुंबात हिच पद्धत लागू करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अजित पवार यांना ते आवडत नसल्यानं कदाचित ते काल शरद पवार यांना भेटले. येत्या काही दिवसांत त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा- मी राष्ट्रवादीचा होतो, आहे आणि राहणार : अजित पवार

अजित पवार हे माझे काका आहे. कुटुंबातील ती एक महत्त्वाची व्यक्ती आहे. अशातच एखादी अडचण आल्यास कुटुंबातील अनेक व्यक्तींनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. अनेक जण त्यांच्याशी बोलले असतील. त्यांनीही कोणाला न टाळत सर्वांचे फोन घेतले. आमचं कुटुंब एक आहे आणि एक राहिल, असंही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2019 9:04 am

Web Title: ncp rohit pawar on senior leader ajit pawar maharashtra vidhan sabha election 2019 jud 87
Next Stories
1 शपथविधी सोहळ्यापूर्वी आदित्य ठाकरे आवर्जून ‘या’ ठिकाणी गेले
2 “अभी तो पूरा आसमान बाकी है”, संजय राऊत यांचं ट्विट
3 राजकारण वेगळ्या ठिकाणी आणि कुटुंब वेगळ्या ठिकाणी : अजित पवार
Just Now!
X