राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अधिकृतपणे आपण भाजपा पक्षात प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आपण उद्या भाजपा पक्षात प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालं आहे.

ट्विटरवर उदयनराजे भोसले यांनी पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी एक पोस्टर शेअर केलं आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, “आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील”,

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपात प्रवेश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ सप्टेंबर रोजी उदयनराजे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी होणार आहेत.

गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची देखील उपस्थिती होती. बैठकीत उदयनराजे यांचं मन वळवण्यात शरद पवारांना यश आलं आहे असं बोललं जात होतं. पण भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मी आणि मुख्यमंत्री उदयनराजेंच्या संपर्कात असून ते भाजपात येतील याबद्दल आशावादी असल्याचं सांगितलं होतं. यामुळे नेमकं काय होणार याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. पण अखेर चर्चेला पूर्णविराम मिळाला असून शनिवारी