01 March 2021

News Flash

शरद पवारांकडून उदयनराजेंची मनधरणी? पुण्यातील निवासस्थानी घेतली भेट

उदयनराजे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली आहे. उदयनराजे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्याच पार्श्वभुमीवर शरद पवारांनी मनधरणी करण्यासाठी उदयनराजे यांची भेट घेतल्याची चर्चा सुरु आहे. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपात जाण्यास विरोध केल्याने खासदार उदयनराजे भोसले आहेत तिथेच थांबतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. म्हणजेच उदयनराजे भोसले राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपात जातील या चर्चांना यू-टर्न मिळाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पुण्यात भाजपा प्रवेशासाठी घेतलेली बैठक स्थगित करण्यात आली. भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही उदयनराजेंच्या प्रवेशाला खो घातला होता. यामुळेही उदयनराजेंचा भाजपा प्रवेश लांबणीवर पडला आहे.

उदयनराजेंचा भाजपा प्रवेश हा गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय आहे. त्यावरून विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. उदयनराजेंनी भाजपात जाऊ नये यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याचं समजतं आहे. एवढंच नाही तर खासदार डॉ. अमोल कोल्हे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उदयनराजेंची भेट घेत त्यांना राष्ट्रवादी सोडू नका अशी विनंती केली होती. या पार्श्‍वभूमीवर उदयनराजेंनी पुण्यात काही कार्यकर्त्यांची भाजपमध्ये जायचं की राष्ट्रवादीतच राहायचं यासाठी एका हॉटेलमध्ये बैठक बोलावली होती. त्यामुळे अनेक कार्यकर्ते पुण्यात हजर झाले होते.अचानक ही बैठक रद्द करण्यात आली. यामुळे उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने नवे वळण घेतले. या बैठकीनंतर उदयनराजे हे भाजप प्रवेशावर यू-टर्न घेत राष्ट्रवादीतच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘आहे तिथंच उत्तम आहे. भाजपात जाणं धोक्याचं ठरू शकतं’ असं म्हणत जवळच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजेंना राष्ट्रवादीतच राहण्याचा आग्रह केला.यावेळी मात्र उदयनराजेंनी कार्यकर्त्यांचे म्हणणे गंभीरपणे ऐकले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने आपल्याविरुद्ध टोकाचा प्रचार करत निवडणुकीत पराजय होईल अशी व्यूहरचना करत प्रचार केला होता. खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपाच्या तिकीटावर पुन्हा पोटनिवडणुकीला सामोरे जाण्यात काही कार्यकर्त्यांना ” रिस्क ‘ वाटत असल्याने हे कार्यकर्ते राजीनामा देऊन भाजपमध्ये जाण्यास अनुकूल नाहीत. त्यामुळे उदयनराजे संभ्रमात असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे उदयनराजेंनीही भाजपा प्रवेशाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली असून ते राष्ट्रवादीतच राहतील, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2019 11:59 am

Web Title: ncp sharad pawar meets mp udyanraje bhosale sgy 87
Next Stories
1 पुणे : गणपती विसर्जन मार्गावर राष्ट्रीय कला अकादमीचे रांगोळीतून पर्यावरणावर भाष्य
2 पुणे : गणपती विसर्जन मिरवणूक, वाहतूक मार्गांमध्ये बदल; १७ रस्ते बंद
3 सापाची नक्कल करणाऱ्या माशाचा शास्त्रीय अभ्यास
Just Now!
X