01 March 2021

News Flash

उदयनराजे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम, शरद पवारांसोबत दोन तास केली चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार उदयनराजे यांची पुण्यात भेट घेतली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार उदयनराजे यांची पुण्यात भेट घेतली. उदयनराजे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. शरद पवार आणि उदयनराजे यांच्यात जवळपास दोन तास बैठक सुरु होती. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी उदयनराजे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असल्याची सुत्रांची माहिती आहे. उदयनराजे राष्ट्रवादी पक्षातच राहणार असल्याचं निश्चित झालं असल्याची माहिती आहे.

बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचे मुद्दे आणि रणनीतीवर चर्चा करण्यात आली. उदयनराजेंची कोणतीही नाराजी नाही. ते पक्षातच असून बाहेर जाण्याची चर्चा झालेले नाही. ते कधीही भाजपच्या प्रवेशावर बोलले नाहीत. मात्र भाजपच्या गोटातून माध्यमांच्या माध्यमातून ही चर्चा केली जात आहे. जनतेचे मत इतर समस्यांवरून इतरत्र वळवण्यासाठी भाजपानं असे प्रयत्न सुरू केलेत”.

“शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी त्यांच्यामागे इतर कामांचा व्याप होता. त्यामुळे ते येऊ शकले नाही. इतर काही राजकीय कारण नाही. ते नाराज नाहीत,” असंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2019 3:15 pm

Web Title: ncp sharad pawar mp udyanraje bhosale dhananjay munde sgy 87
Next Stories
1 प्रत्येकानं अवयवदान करावं, ॐ नमो परिवाराकडून मिरवणुकीमध्ये समाज प्रबोधन
2 भाजपावाल्यांनी टाकून दिलेलं खातं मला दिलं आहे – महादेव जानकर
3 फडणवीस सरकारच्या गडकिल्ल्यांच्या धोरणाला पुणेकरांचा विरोध, विसर्जन मिरवणुकीत फलक
Just Now!
X