07 April 2020

News Flash

आघाडीत टीकेलाही नेते उरले नाहीत – ठाकरे

आघाडीतर्फे निवडणूक लढवण्यास कुणीही तयार नाही.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टीका करण्यासाठीही कुणी नेते शिल्लक राहिलेले नाहीत, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  अमरावती येथील  प्रचारसभेत शुक्रवारी केली.

ठाकरे म्हणाले, आघाडीतर्फे निवडणूक लढवण्यास कुणीही तयार नाही. जे तयार झाले, ते त्यांच्यासोबत राहतील की नाही, याची शाश्वती नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आमच्याकडे आले, ते म्हणतात काँग्रेसमध्ये दम नाही. खरी कामे करणारी माणसे युतीत आहेत. आज देशाला भगव्या विचारांची गरज आहे. आम्ही युती केली नसती, तर भलतेच सरकार डोक्यावर बसले असते. अनुच्छेद ३७० रद्द करण्यास विरोध असलेल्या काँग्रेसचे सरकार आम्हाला नको होते, असेही ठाकरे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2019 12:44 am

Web Title: neither leader is left in the opposition says uddhav thackeray abn 97
Next Stories
1 काँग्रेसचे नेते भुरटे चोर, भाजपचे डाकू -अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
2 आमच्याकडे होता तेव्हा ‘राम’, भाजपात गेल्यावर झाला ‘रावण’
3 “अमित शाह कलम ३७० बद्दल बोलत होते, शेजारच्या गावात शेतकरी करत होता आत्महत्या “
Just Now!
X