नितेशची साथ मरेपर्यंत सोडणार नाही असं सांगत माजी खासदार निलेश राणे यांनी भावासोबत आपला कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार असणारे नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करेन असं वक्तव्य केल्याने निलेश राणे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा सुरु झाली होती. निलेश राणे यांनी या चर्चेला पूर्णविराम देत नितेशची साथ मरेपर्यंत सोडणार नाही असं सांगितलं आहे.

निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली बाजू मांडली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “कालच्या माझ्या ट्विटचा मीडियाने गैर अर्थ काढला असून नितेशची साथ मी मरे पर्यंत सोडणार नाही. नितेशनी मला जे अधिकार दिले त्यातून मी त्याला समजवले. राहिला विषय शिवसेनेचा, ज्या दिवशी शिवसेना राणे साहेबांची बदनामी आणि त्रास देणे थांबवेल त्यादिवशी शिवसेनेचा आणि माझा विषय संपेल”.

INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
sanjay raut raj thackeray
राज ठाकरे यांना मविआत घेण्याचे प्रयत्न का झाले नाहीत? संजय राऊत म्हणाले, “मनसे अध्यक्षांना वाटायचं…”
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”

याआधी नितेश राणे यांच्या आदित्य ठाकरेंसंबंधी केलेल्या वक्तव्यावर निलेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, “नितेशच्या ह्या विषयाशी मी जराही सहमत नाही. ज्या पक्षानी राणे साहेबांना त्रास दिला, माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी सेनेशी दोन हात केले, केसेस घेतल्या, संघर्ष केला त्यांना हे कधीच सहन होणार नाही. राजकारण आपल्या ठिकाणी पण वार मी समोरूनच करणार”.

नितेश राणे यांनी काय म्हटलं होतं ?
निवडणुकीचा प्रचार करत असताना मी शिवसेनेवर टीका करणार नाही. मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द आम्ही पाळत आहोत. माझ्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार असला तरी कुठलाही संघर्ष होणार नाही. गरज भासल्यास आदित्य ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करेन”