News Flash

“काहींना वाटतं…”; फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर निलेश राणेंचे ट्विट

फडणवीस यांनी राज्यापालांकडे राजीनामा सोपवला

निलेश राणेंचे ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याने भाजपाने स्थापन केलेल्या सरकारकडे बहुमत नसल्याचे कारण देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजक्यापालांकडे राजीनामा सादर केला. “अजित पवारांचा राजीनामा आल्याने आमच्याकडेही बहुमत उरलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आमच्यासोबत आल्याने आम्ही सत्ता स्थापन केली होती. आता अजित पवारच आमच्यासोबत नाहीत त्यामुळे आमच्याकडे बहुमत नाही. आम्ही आमदार फोडणार नाही,” असं स्पष्ट करत फडणवीस यांनी राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. फडणवीस यांनी ही घोषणा केल्यानंतर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी एक ट्विट केले आहे.

मागील अनेक दिवसांपासून राज्यातील परिस्थितसंदर्भात वक्तव्य करताना ट्विटवरुन शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या निलेश यांनी फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा ट्विट केलं आहे. “काहींना वाटतं खेळ संपला पण राजकारणात खेळ कधीच संपत नाही. एक संपला की दुसरा सुरू होतो. जो पर्यंत खेळ आणि खेळाडू आहेत तो पर्यंत सामना होणारच,” असं सूचक वक्तव्य निलेश यांनी केलं आहे.

फडणवीस यांनी राजीनामा दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार उद्या बहुमत चाचणी होणार नाही. फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरेंच्या नावावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केले होते. राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी आम्हाला संधी द्यावी असे पत्र या तिन्ही पक्षांनी संयुक्तरित्या राज्यपालांना सोमवारीच दिले आहे. त्यामुळे आता फडणवीस यांनी राजीनामा दिल्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 5:27 pm

Web Title: nilesh rane tweets after devendra fadnavis resignation scsg 91
Next Stories
1 कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती
2 देेशभरात चर्चा फक्त अजित पवारांचीच, शरद पवार अन् फडणवीसांनाही टाकलं मागे
3 मातोश्रीबाहेर न पडणाऱ्यांनी इतरांच्या पायऱ्या झिजवल्या- फडणवीस
Just Now!
X